लैंगिक अत्याचाराची घटना दडपण्याचा प्रयत्न करणा-या चौघांना पाथर्डी पोलीसांनी केली अटक

लैंगिक अत्याचाराची घटना दडपण्याचा प्रयत्न करणा-या चौघांना पाथर्डी पोलीसांनी केली अटक
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : परप्रांतीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना दडपण्याचा प्रयत्न करणा-या चौघांना पाथर्डी पोलीसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि विलास पुजारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई विलास जाधव, पोसई संदिप ढाकणे, पोहेकॉ नितीन दराडे, पोहेकॉ बाबासाहेब बडे, पोकाॅ इजाज सय्यद, पोकाॅ अक्षय वडते, पोकाॅ अमोल जवरे आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी व त्यापूर्वी सुमारे एक महिन्यापासून  तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ३ च्या वर्गात शिक्षण घेणारी ७ वर्षे वयाची अल्पवयीन मुलीस दुपारच्या सुट्टीत शाळेतील मुले बाहेर गेल्यावर शाळेतील शिक्षकाने याने तिला एकटीला शाळेत थांबवून तिस जवळ घेऊन त्याच्या मांडीवर बसवून तिच्याशी लगंट करुन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला आहे. तसेच तिने आरडाओरडा केला असता शिक्षकाने तिला मारहाण केली आहे.
हा गुन्हा घडल्यानंतर पिडीत मुलीच्या आई वडीलांनी ही घटना गावातील लोकांना  सांगितली. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेची कुठेही तक्रार करु नका, नाहीतर आम्ही तुम्हाला गावात राहू देणार नाहीत, असे म्हणून पिडीत मुलीच्या आईवडीलांना धमकावून घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यास विरोध केला आहे, म्हणून याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपी यांना पोलीसांनी गुन्ह्याच्या तपासकामी तात्काळ अटक केली आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!