रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न

आर्थिक उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर नियोजन गरजेचे – स्वप्नील करवंदे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
नगरच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलमध्ये ‘आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनाचे महत्त्व’ या विषयावर श्रीराम इनवेस्टमेंटचे संचालक स्वप्नील करवंदे यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

श्री. करवंदे म्हणाले की, मध्यमवर्गीय माणसाला आजच्या महागाईच्या काळात आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत व कसरत करावी लागत आहे. एवढे सर्व करूनही त्याला त्यात तडजोड करावी लागते किंवा त्यासाठी कर्ज तरी घ्यावे लागते. आपल्या स्वप्नांना अशी मुरड घालावी लागू नये, म्हणून आणि मिळालेल्या पैशांची योग्य त्या गुंतवणुकीच्या माध्यमात योग्य वेळी योग्य वयात गुंतवणूक कशी करावी व त्याचा पाठपुरावा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कसा करावा हे यावेळी त्यांनी सांगितले.
आपल्या सर्वांच्या आयुष्यात सर्वांत महत्वाचे असलेली गुंतवणूक ज्या पायावर उभी असते, त्या आयुर्विमा, मेडिकल विमा व अपघात विमा हमीचीही माहिती त्यांनी थोडक्यात दिली.
हायस्कूलचे मुख्याध्यापक दोडके सर यांनी श्री. स्वप्नील करवंदे व सौ. सारिका करवंदे यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास 25 ते 30 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!