राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष प्रमोद विखे यांचे निधन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : तालुक्यातील सोनविहीर येथील शरद पवार राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रमोद प्रल्हाद विखे यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता हृदयविकार झटक्याने निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ५५ वर्षाचे होत
बोधेगाव परिसरात सर्व परिचित असलेले प्रमोद विखे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात काम हिरहिरीने काम करत होते. त्यांनी केदारेश्वर साखर कारखान्यात काही काळ नोकरी केली लोकनेते बबनराव ढाकणे, प्रतापराव ढाकणे यांचे विश्वासू कार्यकर्ते होत. त्यांच्या मागे पत्नी, आई, विवाहित तीन मुली,एक मुलगा, सून, दोन भाऊ, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे त्यांचा निधना बद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अत्यांविधीस सर्व क्षेत्रातील जनसमुदाय उपस्थित होता


