👉जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव यांची माहिती
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : जल जीवन मिशन कार्यक्रमाची ग्रामपातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी , योजना निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन , युनिसेफ मुंबई व प्रायमूह पुणे च्या वतीने चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव यांनी दिली.
दि.13 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत दूर दृश्य प्रणाली ( झूम ॲप ) द्वारे आयोजित प्रशिक्षणात जल जीवन मिशन ची व्याप्ती , विस्तार तसेच योजना निश्चित कालावधीमध्ये पूर्ण करणे याबाबत राज्य स्थरावरून प्रशिक्षण देण्यात येणार आहे प्रत्यक्ष ग्रामपातळीवर काम करणार्या ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती ला सहाय्य करण्यासाठी राज्य शासनाकडून नेमण्यात आलेल्या संस्थेचे दोन प्रतिनिधी , जिल्हा कक्षातील मनुष्य बळ विकास सल्लागार , पाणी गुणवत्ता सल्लागार , माहिती शिक्षण संवाद सल्लागार , सनियंत्रण व मूल्यमापन , सल्लागार , वित्त संपादणूक सल्लागार , तालुकापातळीवर गट समन्वयक , समुह समन्वयक सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय प्रशिक्षणात सहभाग घ्यावा असे आवाहन कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा प्रकाश खताळ , जल जीवन मिशन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष च्या वतीने करण्यात येत आहे.



