संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai – बोगस पॅथोलॉजी लॅबमुळे बोगस सर्टीफिकेट देण्याचे प्रकार समोर आल्याची माहिती त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीला उत्तर देताना टोपे म्हणाले की, कायदा अस्तित्वात येईपर्यंत जीआर काढू. गरज पडल्यास पॅथोलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑर्डनन्स काढण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
बोगस पॅथोलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकार येत्या तीन महिन्यांत कायदा आणणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. या कायदा आणण्यासाठी १८ सदस्यीय तज्ज्ञ समिती नेमण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील बोगस पॅथॉलॉजी लॅबमधील गैरप्राकारांवर विधान परिषदेच्या सदस्या डॉ मनिषा कायंदे यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. बोगस पॅथोलॉजी लॅबमुळे बोगस सर्टीफिकेट देण्याचे प्रकार समोर आल्याची माहिती त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. या मागणीला उत्तर देताना टोपे म्हणाले की, कायदा अस्तित्वात येईपर्यंत जीआर काढू. गरज पडल्यास पॅथोलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑर्डनन्स काढण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
बोगस सर्टीफिकिकेटचे प्रकार मुंबईतील पॅथोलॉजी लॅबमधून सोमर आल्याचे अनेक परिषदेच्या सदस्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. राज्यात सुमारे १३ हजार पॕथोलॉजी लॕबपैकी ८ हजार पॅथोलॉजी लॅब बोगस असल्याची माहिती मनिषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचनेतून मांडली. मुंबई आणि आसपासच्या परिसरात दीड हजार पॅथोलॉजी लॅब हे अवैधरीत्या सुरू असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.



