संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव – शहरातील मौलाना आझाद प्राथमिक शाळा, ईदगाह मैदान शाळेत जन्मदिवस शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरवातीस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व विद्येची देवता सरस्वती प्रतिमांचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आसमा सय्यद मॅडम व ज्येष्ठ शिक्षिका हदिया बागवान मॅडम यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी शिक्षक दिनाचे महत्त्व व डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा आढावा शहाणा खान मॅडम यांनी प्रस्ताविकातून घेतला.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आसमा सय्यद मॅडम, हादिया बागवान मॅडम,शहाणा खान मॅडम,सना बेग मॅडम,फैमिदा शेख मॅडम यांनी शिक्षकदिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.शिक्षकांचे योगदान सामजिक,शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे आहे.आज आपण जे घडलो ते आपल्या शिक्षकांमुळेच म्हणून त्यांचा हा विचार,ध्येय प्रामाणिकपणे पुढे चालवून आपण सर्व विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन घडवू असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका आसमा सय्यद मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.यावेळी विद्यार्थी मुख्याध्यापक जुबेर शेख,विद्यार्थी शिक्षक जिशान पठाण, आतिफ सय्यद,आर्शिया पठाण,फिजा रेन,यास्मिन शेख,रुस्तुम पठाण, खदिजा काझी, समीर पठाण, फिरदोस पठाण यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहाणा खान मॅडम यांनी केले तर सना बेग मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.


