मोहटादेवी घाट रस्ता २५ ऑगस्ट पर्यंत बंद राहणार : भाविकांनी सहकार्य करावे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर जाणारा रस्ता 25 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर जाणारा घाट रस्ता, तसेच रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असल्याने श्रीक्षेत्र मोहटादेवी गडाकडे जाणारा घाट रस्ता दि. 25 ऑगस्ट पर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे, भाविकांचे वाहने फक्त भक्तनिवास पर्यंतच येतील पुढे वाहने जाणार नाहीत अपंग, वयोवृद्ध व आजारी भाविकांनी याबाबत विशेष नोंद घ्यावी. शारदीय नवरात्र महोत्सव पूर्वी नियोजित रस्ते व अन्य मूलभूत सुविधा अत्यंत दर्जेदार व सुखकर करण्याचा देवस्थानचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.
भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे वतीने केले आहे .


