मोक्कातील आरोपीस ऊस शेतामध्ये पाठलाग करुन अटक ; पाथर्डी पोलिसांची धडक मोहीम

मोक्कातील आरोपीस ऊस शेतामध्ये पाठलाग करुन अटक ; पाथर्डी पोलिसांची धडक मोहीम
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील तसेच सांगवी पोलीस ठाणे (पुणे) येथील मोक्का गुन्ह्यातील फरारी आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड (रा.निवडुंगे ता. पाथडी जि. अहिल्यानगर) याला हनुमान टाकळी शिवारात पाठलाग करुन ऊसाच्या शेतामध्ये त्यास जागीच पकडून पाथर्डी पोलिसांनी अटक केली आहे.
एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक
वैभव कलबूर्मे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि विलास पुजारी यांच्या सुचनेनुसार पोउपनि संदिप ढाकणे, पोकाॅ कानिफनाथ गोफणे आदींनी ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२४ जुलै २०२५ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास तिसगाव ते पाथडी जाणा-या रोडवर निवडुंगे गावचे शिवारात मित्र शिवम भारत आठरे (रा. पारेवाडी ता. पाथर्डी) असे तिसगांवकडून पाथर्डीकडे दुचाकीवर आरोपी विकी पोपट भोसले (रा.कासारवाडी ता. पाथर्डी), अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुंगे ता. पाथर्डी), लखन बाबासाहेच कासार (रा. कासारवाडी ता. पाथर्डी) व एक अनोळखी अशांनी पाठीमागुन एका विना नंबरच्या पांढरे रंगाचे स्पिट गाडीतून येऊन मला व साक्षीदार यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन त्यांना खाली पाडले. व त्यानंतर विकी पोपट भोसले, अक्षय दत्तात्रय मरकड व त्याचा एक अनोळखी साथीदार अशांनी मला व साक्षीदार अशांना लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी करुन माझ्या पॅन्टचे खिशातील ७ हजार ५०० रुपये व त्याचे गळ्यातील ७५ हजार रुपये किंमतीचे तिन तोळ्यांची सोन्याची चैन बळजबरीने चोरुन नेली, तर मला व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले, या अक्षय राजेंद्र जायभाये यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८१०/२०२५ मा न्या.सं. २०२३ चे कलम ३०९(४), ३०९ (६), ३(५) प्रमाणे गुन्हा रजि दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असतांना आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुंगे ता. पाथर्डी. जि अहिल्यानगर) हा शनिवार ( दि. २ ऑगस्ट २०२५) रोजी हनुमान टाकळी शिवारात असल्याबाबत माहिती मिळाल्याने पोनि विलास पुजारी यांच्या आदेशान्वये पोउपनि संदिप ढाकणे, पोकाॅ कानिफनाथ गोफणे यांनी आरोपीचा शोध घेतला असता तो पोलीसांना पाहून पळू लागल्याने पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन ऊसाचे शेतामध्ये त्यास जागीच पकडून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली.
आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुंगे ता. पाथर्डी) याच्याविरुध्द पाथर्डी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!