मैला मिश्रित गोदापत्रात गणपती व देवी मूर्तीचे विसर्जन करायचे का? ढाकणे यांचा प्रशासनाला सवाल

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कोपरगाव –
मैला मिश्रीत प्रदूषित झालेल्या गोदावरी नदी पात्रात नागरिकांनी गणपती व देवी मूर्तीचे विसर्जन करायचे का? असा सवाल गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन दिले आहे.

गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी तहसीलदार बोरुडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव शहरातून दक्षिणगंगा म्हणून समजली जाणारी पवित्र अशी गोदावरी नदी वाहते, परंतु गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे पवित्र अशा गोदावरी नदीपात्रात कोपरगाव शहरातील सर्वच गटारीचे मैला मिश्रीत पाणी जाऊन मिळते तसेच कोपरगाव शहरात सुरू असणाऱ्या अवैध कत्तलखान्यात मोठ्याप्रमाणात होणाऱ्या जनावरांच्या कत्तलीमुळे त्यांच्या रक्ताचे झरे व मांसाचे तुकडे देखील या गटारीच्या पाण्यात मिक्स होऊन ते देखील गोदावरी नदी पात्रात जाऊन मिळते. अशा एक ना अनेक कारणाने प्रदूषित झालेल्या गोदावरी नदी पात्रात कोपरगाव शहरातील नागरिकांनी तोंडावर आलेल्या गणेश उत्सवाच्या काळात १० दिवस मनोभावे पूजा-आरती करत स्थापन केलेल्या श्री गणेशाची मूर्ती तसेच नवरात्र उत्सवात ९ दिवस मनोभावे पूजा आरती करत स्थापन केलेली देवीची मूर्ती या कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्रा अशा कोपरगाव नगरपालिकेच्या नियोजन शुन्य कारभारामुळे प्रदूषित झालेल्या गोदावरी नदी पात्रात विसर्जित करायच्या का? असा सवाल गोदावरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी तहसीलदार बोरुडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जर प्रशासनाने अथवा कोपरगाव नगरपालिकेने येणाऱ्या गणेश उत्सव व नवरात्र उत्सव निमित्त घराघरामध्ये स्थापन होणाऱ्या श्री गणेश व देवी मूर्तीचे विसर्जन करण्याकरता काहीतरी व्यवस्था करावी तसेच कोपरगाव शहरातून वेगवेगळ्या गटारी मार्फत गोदावरी नदीपात्रात जाणारे मैला मिश्रीत पाणी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, अन्यथा गणपती विसर्जनाच्या व देवी मूर्ती विसर्जनाच्या दिवशी गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने गोदावरी नदीकिनारी प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्याफिती लावून दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा ढाकणे यांनी दिला आहे. ढाकणे यांनी सदर निवेदनाची प्रत कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी ना.आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना देखील दिली आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी अहमदनगर यांना देखील ई-मेल वर निवेदन पाठवले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!