मुख्यमंत्र्यांचे खरे ड्रायव्हिंग स्किल कोकणात बघायचे होते : भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ


👉पहिल्यांदाच आयपीएस अधिका-याने गृहमंत्र्यांवर आरोप करण्याची घटना महाराष्ट्रात घडली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – राज्यात पुर चालला आहे. मुख्यमंत्र्यांचे ड्रायव्हिंग स्किल हे कोकणात बघायची आम्हाला फार इच्छा होती, आम्हाला म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला होती, असे अहमदनगर दौऱ्यावर असणाऱ्या भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी अहमदनगर येथे पञकारांशी बोलताना म्हटले.

श्रीमती वाघ या सत्ताधारी आघाडीवर पुढे म्हणाल्या, पहिल्यांदा कुठल्या आयपीएस अधिकाऱ्याने एका गृहमंत्र्यांवर आरोप केले आहेत. हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडले आहे. त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. त्याला पकडले, तो काहीतरी माहिती देत असेल. त्याप्रमाणे पोलीस पुढे काम करत असतील. ‘हे म्हणायचे त्याला आम्ही सांगतो’, हे म्हणणे बालिशपणाचे आहे. ज्या पद्धतीने सांगितले असेल ते आपल्याला माहिती नाही. पुढील कारवाई ही मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजत असल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!