मिसिंग दाखल नसतानाही तपासात राहुरी पोलिसांकडून खूनाचा गुन्हा उघड

लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीच्या क्रूरतेचा कळस ः खुनाच्या गुन्हयातही अजून आरोपी वाढण्याची शक्यता!

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी ः मिसिंग दाखल नसताना तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे परिपूर्ण तपासा करून गुन्ह्याच्या तपासापयर्र्ंत पोहचून लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात एकाचा खून झाल्याचा तपासात निष्पन्न करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी राहुरी पोलिस ठाण्याचे संजय ठेेंगे यांच्या सूचनेनुसार सर्व राहुरी तपासी टीमने केली आहे. अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे स्वयंसेवक पूजा दहातोंडे यांनी दि. 17 सप्टेेंबर 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांना दिलेल्या माहितीवरून चार अल्पवयीन पीडित मुलींची सुटका करत लैंगिक अत्याचार करणारे बजरंग कारभारी साळुंखे(वय 39), शितल बजरंग साळुंखे (वय 40, दोघे रा. दवणगाव ता.राहुरी) यांना राहुरी पोलिसांनी दि.18 सप्टेेंबर 2025 रोजी अटक केली. एसपी सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, डिवायएसपी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांच्या सूचनेनुार पोउपनि राजू जाधव, पोहेकॉ. सुरज गायकवाड, राहुल यादव, शकूर सय्यद, अशोक शिंदे, पोकॉ. गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुर्‍हाडे, अजिनाथ पाखरे, गोवर्धन कदम, मपोकॉ. मीना नाचन, वंदना पवार, शिवानी गायकवाड, अंजली गुरवे आदींच्या टीमने ही कामगिरी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय 32, रा. राहाता) यास अटक करणे बाकी होते. अटक आरोपीच्या मदतीने पाहिजे आरोपीस अटक करण्याकरिता व इतर तपासाकरिता अटक दांपत्यास दि.19 सप्टेेंबर 2025 रोजी न्यायालयासमोर हजर करून त्यांची दि.24 सप्टेेंबर 2025 रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. पोलीस तपासा दरम्यान दांपत्याने अल्पवयीन मुलींपैकी एका अल्पवयीन मुलीचे(ती 14 वर्षाची असताना) 50 वर्षीय व्यक्तीसोबत पाच वर्षापूर्वी लग्न लावून 1 लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. यानंतर परत तीन महिन्याने तिला आपल्याकडे राहण्यासाठी आणले. तर दुसर्‍या मुलीचे (वय 16) अल्पवयीन असताना लग्न लावून देण्यासाठी 3 लाख रुपये घेतले असल्याचे तपासात समजले. याबाबत अधिक तपास सुरू असताना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये अटक आरोपींकडे पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर (वय 32, रा. राहाता) याच्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.


परंतु दि.23 सप्टेेंबर 2025 रोजी अटक आरोपींकडे कसून चौकशी केली असता बजरंग कारभारी साळुंखे (वय39, रा. दवणगाव) याने गुन्ह्यात पाहिजे आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याच्यासोबत मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याच्या कारणाने मार्च 2025 मध्ये एके दिवशी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरी गळा दाबून खून करून त्याचा मृतदेह ज्या खोलीत त्याचा खून केला, तेथेच रात्री 10वाजेपर्यंत ठेवून, रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरामागे खड्डा खोदून मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नीच्या साह्याने पुरून लपवून ठेवल्याचे सांगितले.
भारतीय न्याय संहिता कलम 196 अन्वये माहितीची खातरजमा करण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि संजय ठेंगे यांनी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट श्रीमती संध्या दळवी यांना पाचरण करून दोन पंचा समक्ष अटक आरोपीने दिलेल्या माहितीप्रमाणे खात्री केली. दुपारी 12 ते 4 वाजे दरम्यान आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी देवळाली नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने माती उकरून पाहिले असता मृतदेह मिळून आला.
मृत आरोपी निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर हा राहाता येथील राहणारा असून त्याचे आईवडील मयत झाले असल्याने तो अटक दांपत्याकडेच राहत होता. त्यामुळे त्याची कुठेही मिसिंग किंवा हरवल्याबाबतची तक्रार देण्यात आलेली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृतदेहाची दवणगाव येथील स्थानिकांच्या मदतीने तो निलेश जगन्नाथ सारंगधर उर्फ गाडेकर याचाच असल्याची खात्री करण्यात आली.
मृतदेह फॉरेन्सिक तपासणी कामी प्रायमरी हेल्थ सेंटरचे वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर तहा खान व प्रसाद मासाळ यांच्यामार्फत पोस्टमार्टम करून अंत्यविधी करिता त्याचे नातेवाईक नसल्याने दवणगाव ग्रामपंचायत यांच्या ताब्यात देऊन त्यांच्या मदतीने सरकारी पंचां समक्ष अंत्यविधी करण्यात आला. याबाबत राहुरी पोलिसांच्या वतीने पोउपनि राजू जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापयर्र्ंत सुरू होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!