महिला आर्थिक विकास महामंडळ, संपदा ट्रस्ट आणि रिलायंस फौंडेशनतर्फे मोफत लसीकरण उपक्रमास प्रतिसाद

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
महिला आर्थिक विकास महामंडळ, संपदा ट्रस्ट आणि रिलायंस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.


महिला आर्थिक विकास महामंडळ, संपदा ट्रस्ट आणि रिलायंस फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत लसीकरण उपक्रमाचे आयोजन दि २८ आणि २९ सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील सुरभी हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. या लसीकरण उपक्रमात स्थानिक बचतगट, कामगार वर्ग आणि वयोवृद्ध लोकांनी सहभागी होऊन त्याचा लाभ घेतला. असाच उपक्रम पुढील कालावधीत पण सुरू राहणार आहे सुरभी हॉस्पिटल येथे पुन्हा आयोजित केला जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा सर्व इच्छुक व्यक्तींनी सहभागी हावे ही अपेक्षा रिलायंस फौंडेशनचे व्यवस्थापक  संदीप गुंजाटे यांनी व्यक्त केली आहे.

कार्यक्रमास संपदा ट्रस्टचे व्यवस्थापक अनिरुद्ध मिरीकर,  महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित कर्तृत्ववान लोक्संचालीत साधन केंद्रचे मच्छिंद्र कुर्हे, व्यवस्थापक शामल कोचेवड व सहयोगिनी आणि संपदा ट्रस्टचे सतीश भिंगारदिवे, कु.डिम्पल असनानी आणि अंकुश खाडिलकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!