महाराष्ट्र शासनाने पुरग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून विशेष पॅकेज जाहीर करावे : बाळासाहेब ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
पाथर्डी : पाथर्डी व शेवगांव तालुक्यात भयानक पुरस्थिती निर्माण झाल्यामुळे गावा गावामध्ये तसेच घरामध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू व अन्नधान्य वाहुन गेले आहे. शेतातील संपूर्ण पिके पाण्यामध्ये आहेत. त्यामुळे संपुर्ण पिकांची नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आसुन कधी नव्हे एवढया मोठया संकटात सापडला आहे. या परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने पुरग्रस्त, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून विशेष पॅकेज जाहीर करावे अशी मागणी अहिल्यानगर राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
श्री ढाकणे यांनी ऑनलाईन निवेदनात म्हटले आहे की, अनेक रस्त्यावरील पुलं वाहून गेल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. मायबाप सरकारला माझी विनंती आहे, की सध्या पावसाची परिस्थिती असल्यामुळे पंचनामे करण्यास अडथळा येत आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांचा संसारच वाहून गेल्यामुळे सरकारने पंचनामे करण्यात वेळ घालण्याऐवजी पाथर्डी, शेवगांव व महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये पुरामुळे व अती पर्जन्यवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्याकामी मंत्रीमंडळाची विशेष बैठक बोलावून विशेष पॅकेज जाहीर करावे. हवालदिल व संकटात सापडलेल्या पुरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने तातडीने आधार द्यावी. पुरग्रस्त व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासनाने संकटकाळात खंबीरपणे उभे राहवेत, असे म्हटले आहे.


