महसूलमंत्री विखे पा.यांचा सावळीविहीर बु!! ग्रामपंचायत तर्फे सत्कार

👉मुस्लिम, ख्रिश्चन व गिरी गोसावी आणि राष्ट्रीय घरकुल योजना शासकीय इमारतीसाठी जागा द्यावी, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे सावळीविहीर बु ग्रामपंचायतीची निवेदनाद्वारे मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु ग्रामपंचायत तर्फे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. दरम्यान ग्रामपंचायतीच्या वतीने  विविध मागण्यांचे निवेदन ना.विखे पा. यांना देण्यात आले.


  मुस्लिम, ख्रिश्चन व गिरी गोसावी आणि राष्ट्रीय घरकुल योजना शासकीय इमारतीसाठी जागा द्यावी, अशी मागणी टसावळविहीर ग्रामपंचायतीच्या वतीने राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान महसूलमंत्री  ना. राधाकृष्ण विखे पा. यांचा सावळीविहीर बु!! तर्फे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी  सरपंच गणेश आगलावे, राहाता बाजार समितीचे उपसभापती व ज्येष्ठ नेते बाळासाहेब जपे पा.,  तंटामुक्तीचे अध्यक्ष  राजेंद्र आगलावे,  सेवा सोसायटीचे संचालक  सुनील आगलावे,  ग्रामपंचायत सदस्य  सागर पगारे, स्वप्निल पारडे,  किरण आगलावे,  राहुल आगलावे,  ज्ञानेश्वर जपे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!