भिंगार सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पुणे प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची छावणी परिषदेच्या घोटाळया संदर्भात घेतली भेट

                                                

  👉छावणी परिषदेच्या पथकर नाका घेणा-या एन.एच.इंजीनियरिंग कंपनी व ठेकेदाराने बँक गॅरंटी 4 करोड 50 लाख रुपयाचे बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप – मतीन सय्यद   👉प्रिन्सिपल डायरेक्टर संजू कुमार हे छावणी परिषदेच्या नाक्या संदर्भात चौकशी करून 48 तासात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020-21 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ भिंगार येथील सर्वपक्षाच्या वतीने पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
भिंगार छावणी परिषदेच्या सावळागोंधळाबाबतचे सर्व माहिती देऊन निवेदन देताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रकाश लुणिया, काँग्रेसचे श्याम वागस्कर, आरपीआय युवा जिल्हा अध्यक्ष अमित काळे, शिवसेनेचे प्रतीक भंडारी, अँड. अक्षय भांड, सामाजिक कार्यकर्ते नईम शेख आदी उपस्थित होते.                                        
दरम्यान छावणी परिषद पथकर नाक्याचे  ठेकेदार  एन.एच.इंजीनियरिंगसाठी व्यवस्थापक  एम.आर.मधुर बागायत यांच्याशी संपर्क साधला,  असता, लक्षात आले की, ठेकेदाराने कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी फसवणूक केलेली आहे. त्यामध्ये ठेकेदाराने पथकर नाका घेताना बँक गॅरंटी बँक सोळवेन्सी 4 करोड 50 लाख रुपयांची देण्यात आली आहे.  यामध्ये बँक गॅरंटी हे  बनावट असल्याचे सय्यद यांच्या निदर्शनास आले. कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निधीची पेमेंट स्लीप देण्यात आली.  सप्टेंबर 2020 मध्ये निविदा ऑनलाईन उघडण्यात आली. नोव्हेंबर महिन्यात एन.एच.इंजीनियरिंगला ठेका दिला.  यामध्ये दोन महिन्याची तफावत का केली ? ई निविदामध्ये टेंडर भेटल्यावर 15 दिवसात घेतले नाही, तर ते री- टेंडर करण्याचे आदेश असून देखील दोन महिन्याची मुदतवाढ ठेकेदाराला देण्यात आली. यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.  एन.एच. इंजीनियरिंग कडून व्ही.ई.टी.ची जबाबदारी घेताना तुमच्या कार्यालयाने ठेकेदारांकडून थकबाकी चे प्रमाणपत्र घेतले होते. प्रकरणांमध्ये छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची चूक निष्पन्न झाल्यामुळे पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांच्याकडे भिंगार येथील सर्व पक्षाच्या वतीने ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार हे म्हणाले की, संबंधित प्रकरणावर चौकशी करून 48 तासात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले, असल्याचे मतीन सय्यद यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!