भिंगार शहरातील विकास कामांचा लवकरच मा.खा.डॉ.सुजय विखे पा. यांच्या हस्ते शुभारंभ ः वसंतराव राठोड

 

भिंगार शहरातील विकास कामे होण्यासाठी वसंतराव राठोडांचा मोठा पाठपुरावा

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः मागील आर्थिक वर्षात मा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांच्या विकास निधीतून भिंगार शहरातील विविध विकास कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीच्या अंतर्गत शहरातील विविध रस्ते, शनिमंदिर सुशोभीकरण, ड्रेनेज यासह अन्य कामांचा समावेश आहे. या कामांसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नाहारकत दाखले देण्यात आले आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रशासकीय प्रक्रिया थांबली होती. त्या विकास कामांचा शुभारंभ लवकरच मा. खासदार सुजय विखे पा. यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती भिंगार भाजपाचे  प्रदेश कार्यकारणी सदस्य  तथा कॅन्टोन्मेेंट बोर्डाचे मानद सदस्य वसंतराव राठोड यांनी दिली.


श्री राठोड यांनी म्हटले आहे की, भिंगार शहरातील विकास कामे होण्यासाठी प्रशासकीय मान्यता,  ई-टेंडर पासून ते संबंधित कामांची वर्कऑर्डर काढण्यापयर्र्ंत मा. खासदार डॉ. सुजय विखे पा. यांच्यामाध्यमातून मोठा पाठपुरावा केला. यात मागील आर्थिक वर्षात भिंगारमधील रस्ते, गटारी, अशी अनेक अंदाजे 2 कोटी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. या विकास कामांचा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी माजी खासदार डॉ.सुजय विखे पा. यांच्या हस्ते वर्कऑर्डर झालेल्या भिंगारातील विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.


गवळीवाडा भागातील राठोड मेडीकल ते रणजित हॉटेल पर्यंत रस्ता डांबरीकरण, कॉक्रीटीकरण, ज्येष्ठ नागरी संघ ऑफिस समोरील रासने दुकान ते कॅन्टोन्मेेंट शाळा व चहा टपरीपयर्र्ंत रस्ता डांबरीकरण, कॉक्रीटीकरण., प्रकाश फुलारी घर ते अमित दळवी घर कारपेट, कॉक्रीटीकरण, वाघस्करगल्ल्ली येथे दीपक बोनकर घर ते लक्ष्मण माहिते घर कारपेट, कॉक्रीटीकरण, पाटीलगल्ली (महेश पतसंसस्था ते चौधरीघर) कारपेट, कॉक्रीटीकरण आदींसह विविध विकासकामांची वर्क ऑर्डर निघाली असून,  या सर्व कामांचा शुभारंभ मा. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!