भारत माझा देश आहे, ही “प्रतिज्ञा” म्हणतांना देशाभिमान बळावतो : जिल्हाध्यक्ष सुनील पंडित

!! यदुनाथ थत्ते जन्मशताब्दी निमित्त ‘प्रतिज्ञा’ पुस्तक प्रकाशन !!
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
देशभरातील शाळेशाळेत विद्यार्थी भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा म्हणतात तेव्हा एक भारतीय नागरिक म्हणून आपला देशाभिमान बळावतो. ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ हे पुस्तक वाचल्यावर देशप्रेम अधिक घट्ट होत जातो असे प्रतिपादन अहमदनगर मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांनी केले.


जिज्ञासा अकादमीच्या वतीने थोर सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, संपादक दिवंगत यदुनाथ थत्ते यांच्या जन्मशताब्दी निमित्त अहमदनगर शहरातील मान्यवर मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
अहमदनगर मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पंडित शहर जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव बेरड, सचिव, बाबासाहेब शिंदे, उल्हास दुगड, विजय पोकळे, सुनील सुसरे, सुभाष ठुबे, संजय कुलकर्णी, संपत काळे, राजेंद्र एडके, संजय पडोळे, काशिनाथ हापसे, शिवाजीराव घाडगे, दीपक रामदिन, भरत बिडवे, राजेंद्र बेद्रे, अनिल सुद्रिक या सर्व मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिज्ञा या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बेरड, शिंदे, दुगड, पोकळे, ठुबे, काळे, एडके, हापसे, घाडगे, रामदिन, बिडवे आदी मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे स्वागत केले व कौतुक केले. प्रतिज्ञा याचा अर्थ मुलांना व्यवस्थित समजला तर मुले देशप्रेमाने ओतप्रोत बहरतील असेही अनेकांनी म्हंटले. जिज्ञासा अकादमीच्या उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सर्वांनी दिले.
भाषण भवनात झालेल्या या कार्यक्रमात जन्मशताब्दीचे निमंत्रक व ज्यांनी प्रतिज्ञा या विषयावर एक हजार व्याखाने दिली असे विचारधाराचे अध्यक्ष विठ्ठल बुलबुले म्हणाले की, प्रतिज्ञा चा उगम तेलुगु साहित्यिक पेदेमेरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिली आहे व ती भारत सरकारने २६ जानेवारी १९६५ पासून देशभर लागू केली. या प्रतिज्ञा चा सहज सुलभ अर्थ सांगणारे पुस्तक फक्त मराठीत आहे व ते मराठी साहित्यिकाने लिहून राज्यभरात पोहचवले. हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाकडे असले पाहिजे व त्यांनी ते वाचून आचरण केले पाहिजे.
प्रतिज्ञेत आठ ओळींचा अर्थ संवादी स्वरुपात लिहिला आहे. मुलांना मुलींना व शिक्षकांना या प्रतिज्ञेचा अर्थ कळल्यावर प्रतिज्ञा घेतांना मनातील देशाबद्दलची प्रेम भावना, निष्ठा, श्रद्धेला आणि करू पाहत असलेल्या संकल्पांना बळकटी येते असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि सुत्रसंचालन संगीता गाडेकर यांनी केली. आभार प्रदर्शन सुनील कुलकर्णी यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!