संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : शहरातील प्रसिद्ध व तरुण आर्किटेक्ट आमीर अख्तर शेख यांचा अहमदाबाद चे “इनसाईट आर्किटेक्चर” या मॅगेझिनमध्ये भारतातील प्रसिद्ध आर्किटेक्चरच्या सुमारे 20जणांच्या पहिल्या पानावर छापलेल्या यादीत फोटोसह माहिती देण्यात आली आहे.
या मॅगेझिनमध्ये आमीर शेख याने हॉस्पिटलचे डिझाईन कसे असावे?, छोट्या जागेत चांगले व व्यवस्थित हॉस्पिटल कसे उभारता येते?, रुग्णांसाठी फायदेशीर व सर्व बाबींची पूर्तता कशी करता येते? व ते कसे फायदेशीर उभारले पाहिजे? आदि माहिती देण्यात आली आहे.
शेख आमीर अख्तर या तरुण आर्किटेक्ट च्या या यशा ने नगर शहरच नव्हे तर जिल्ह्याचे नाव भारतामध्ये प्रसिद्ध झाले आहे.
शेख आमीर याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



