संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बीड- बीडच्या रजिस्ट्री कार्यालयात गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या घटनेत दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सतिश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. या घटनेत चार राउंड फायर करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सतिश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी ही दोघे जखमी झाले आहेत. फायरिंग करणारा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारणा केली. जोपर्यंत जखमी आपला जबाब नोंदवत नाही, तोपर्यंत आरोपी किंवा घटनेबाबत सविस्तर माहिती देता येणार नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले.




