प्रत्येक ग्राहकांने आपल्या हक्काबद्दल जागृक राहायला हवे – ॲड धनंजय जाधव

 ग्राहक संरक्षण कायदा पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

अहमदनगर – जागो ग्राहक जागो म्हणत देशातील नागरिकांना जागृत करण्याचे, सजग करण्याचे काम जाहिराती करीत असताना  प्रत्येक ग्राहकांने आपल्या हक्का बदल जागृक राहायला हवे. असे प्रतिपादन माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी केले.
    विचारधारा प्रकाशन व जिज्ञासा अकादमीच्या वतीने  निवृत्त न्यायधीश ओंकारसिंह पाटील यांनी लिहिलेल्या “2019 चा ग्राहक संरक्षक कायदा, ग्रहाकांचा फायदाच फायदा”  या पुस्तकाचे प्रकाशन  ॲड. धनंजय जाधव यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी यशदाचे मानद व्याख्याते प्रा. विठ्ठल बुलबुले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वृषाली करोसिया, सुनील कुलकर्णी, बी. यु. कुलकर्णी, संभाजी पवार, सुभाष बेरड, विजय बेरड, अरुण बुलबुले, लता बुलबुले, विश्वास फुलारी आदी मान्यवर उपस्थित होते.
   ॲड. धनंजय जाधव म्हणाले की, या पुस्तकाचे लेखक असलेल्या निवृत्त न्यायाधीश महोदयांनी सर्वसामान्य लोकांसाठी लिहिले आहे. आधुनिक ग्राहकपेठ आता किचकट व व्यापक झाल्याने असल्याने नव्या कायद्यात अनेक गोष्टीचा समावेश केले आहे, ते लोकांना सहज सोप्या पद्धतीने समाजवे म्हणून या पुस्तकात साध्यासोप्या भाषेत कायदा उलघडून सांगितला आहे,  या पुस्तकामुळे कायद्या बाबत लोकांचे अज्ञान दूर होऊन ग्राहक म्हणून नागरिक जागृत होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     सावेडीतील भाषण प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वृषाली करोसिया, सुनील कुलकर्णी, संभाजी पवार  यांनी या कायद्या विषयी आपले अनुभव कथन केले.
  अध्यक्षस्थानावरून बोलताना माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले म्हणाले की, जागतिक ग्राहक चळवळीच्या इतिहासात 20 वे शतक फार महत्वाचे आहे, 15 मार्च1962 रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहक हक्काची घोषणा केली म्हणून 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन जगभर साजरा होतो. भारतात अनेक चळवळीतून आंदोलनातून व अनेकांच्या अथक प्रयत्नातून 24 डिसेंबर 1986 रोजी राष्ट्रपतींनी सही केल्याने आपण 24 डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करतो. दि. 9 ऑगष्ट 2019 रोजी नव्याने आलेल्या कायद्यामुळे  ग्राहकांना नवीन  सहा हक्क प्राप्त झाल्याने नागरिकांनी ते हक्क समजून व जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी आमचे मित्र न्यायाधीश ओंकारसिंह पाटील यांचे हे पुस्तक आपल्या सर्वांना वास्तवादी व सहज सोपे मार्गदर्शन करेल.
    या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संगीता गाडेकर म्हणाल्या येत्या 24 डिसेंबर पर्यंत  एक हजार ग्राहकांपर्यंत हे पुस्तक पोहचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. स्वागत नामदेव एडगे यांनी केले तर आभार कल्पना बुलबुले यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!