संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – अमरावती येथील पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी नुकतीच ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’ पदवी मिळवली आहे. यापूर्वी ही त्यांनी विविध क्षेत्रातील संबंधित १३ पदव्या घेतल्या आहेत.
श्री डाॅ.राठोड यांना ‘डिप्लोमा इन सायबर लॉ’ ही पदवी प्राप्त झाल्याने पोलिस प्रशासनातून वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
यापूर्वी अहमदनगर येथे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून असताना वाहनाच्या वापरण्यास बंदी असलेल्या एलबीटी प्रकारच्या घातक डिझेलमध्ये रंग बदलून डिझेलची तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड केली होती. या महत्त्वपूर्ण कारवाईमुळे संपूर्ण राज्यात सर्वत्र श्री डाॅ राठोड यांची विशेष चर्चा झाली. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडीमुळे त्यांची अमरावती येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली.



