संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्प २०२२ मध्ये ऑगस्ट ५० कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजूरी मिळालेली आहे. या कामामध्ये राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणा करण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

शेवगांव – पाथर्डी तालुक्यातील वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग सन २०२१ मधील अतिवृष्टी व महापुरामुळे अत्यंत खराब व वाहतूकीसाठी धाकादायक झाल्याने या रस्त्यांची पुन:बांधणी तसेच आतिवृष्टीने जीर्ण झालेल्या रस्त्यांची मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. मागील दोन वर्ष रस्त्यांच्या कामांना अर्थसंकल्पात तरतूद झाली नसल्याने रस्त्यांची कामे होऊ शकली नव्हती. परंतू आता मंजूर झालेल्या निधी मधून मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे कामे होतील. तसेच उर्वरीत राहिलेल्या कामांना निधी मिळणेसाठी मी प्रयत्नशिल आहे, असे मआदार राजळे म्हणाल्या. या
मंजूर ५० कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या कामामध्ये मिरी – शेवगंव रस्त्यासाठी पाच कोटी ५५ लाख, तिसगाव शेवगाव रस्त्यासाठी चार कोटी ७० लाख, शेवगाव – गेवराई रस्त्यासाठी सहा कोटी २५ लाख, नेवासा – शेवगाव-गेवराई रस्त्यासाठी सहा कोटी २५ लाख, बाभुळगाव गदेवाडी-मुंगी रस्त्यासाठी दोन कोटी, ढोरजळगाव आव्हाणे- अमरापुर रस्त्यासाठी दोन कोटी २५ लाख, कोरडगाव बोधेगाव रस्त्यासाठी तीन कोटी, वरूर सुसरे – पागोरीपिंपळगाव आगसखांड रस्त्यासाठी एक कोटी ५० लाख, कोरडगांव – जिरेवाडी नांदूरनिंबादैत्य- भगवानगड रस्ता यासाठी १२ कोटी, रामा – २२२ ते पागोरी पिंपळगाव – साकेगाव-पाडळी रस्त्यासाठी दोन कोटी ५० लाख, चिंचपूर इजदे-पिंपळगाव टप्पा जोगेवाडी रस्त्यासाठी तीन कोटी ५० लक्ष किंमतीच्या कामांना मंजूरी मिळालेली आहे. या अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांना एवढया मोठया प्रमाणात निधी दिल्यामुळे आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.


