पावणेदोन लाखांची देशी-विदेशी दारु पकडली ; कोतवाली पोलिसांची कारवाई

पावणेदोन लाखांचा देशी-विदेशी दारु पकडली ; कोतवाली पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : रिक्षातून देशी-विदेशी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्यांवर कोतवाली पोलीसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत १ लाख ९४ हजार ४८८ रुपयांचा मुद्देमाल केला जप्त आहे.
एसपी सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोनि प्रताप दराडे यांच्या सूचनेनुसार पोसई गणेश देखमुख, गुन्हे शोध पथकाचे पोहेकाॅ बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सुर्यकांत डाके, पोकाॅ अभय कदम, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, सफौ/संभाजी कोतकर, मपोकॉ प्रतिभा नागरे आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
दि.२४ जुलै रोजी १.३० वाजेच्या सुमारास पोनि प्रताप दराडे यांना माहिती मिळाली की, अहिल्यानगर शहरातील जुने कोर्ट गल्ली, फॅमिली न्यायालयाचे समोरुन रोडने एकजण हा रिक्षामध्ये देशी व विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करणार आहे. या माहितीनुसार अहिल्यानगर शहरातील जुने कोर्ट गल्ली, फॅमिली न्यायालयाचे समोररोडवर जाऊन सापळा लावला. या दरम्यान २ वाजता एकजण जुने कोर्ट गल्ली, फॅमिली न्यायालयासमोर रोडवर, अहिल्यानगर येथे रिक्षामध्ये देशी व विदेशी दारुची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने कारवाई करण्यात आली. पोलीसांनी पंचासमक्ष कारवाईत देशी, विदेशी दारु, १ मोबाईल फोन व बजाज कंपनीची कॉम्पॅक्ट रियर रिक्षा असा एकूण १ लाख ९४ हजार ४८८ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला.
चंद्रकांत मोहनलाल परदेशी (वय ३८, रा. मंगल गेट हवेली, कोंड्यामामा चौक, अहिल्यानगर) याच्याविरुध्द सरकारतर्फे पोकाॅ महेश सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं.६७७/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ सलीम शेख हे करीत आहे.

 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!