पालकमंत्री यांच्या आश्वासनानंतर भगवानगड संघर्ष कृती समितीचे मंञालयासमोरील उपोषण स्थगित

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा 👉ऑनलाईन नेटवर्क

पाथर्डी- भगवानगड व परिसरातील गावं नळपाणी पुरवठा योजनेला गती मिळावी, या मागणीसाठी दि.13 रोजी मंत्रालयासमोर उपोषण करणारा होतो.परंतु पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लेखीपत्र देऊन गणपती विसर्जनानंतर पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईला बैठक घेऊ असे आश्वासन दिले असल्याने व तसे पालकमंत्री यांनी लेखीपञ दिल्याने  हे उपोषण स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती भगवानगड संघर्ष कृती समितीचे संजय बडे पा यांनी ‘नगर रिपोर्टर ‘शी बोलताना  दिली आहे.

जिल्ह्यातील  पाथर्डी तालुक्यातील भगवानगड व ३५ गावे व त्या खालील वाड्यांसाठीच्या नळपाणी पुरवठा योजनेबाबत तातडीने ग्रामविकासमंञी यांनी बैठक घ्यावी. योजना पूर्ण होण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, याची कार्यवाही तातडीने करावी, यामागणीचा ग्रामविकासमंञी यांनी पाणी पुरवठा व स्वच्छतामंञी यांच्याकडे तातडीने नियोजन करून योजना मार्गी लावण्यासाठी बैठक घ्यावी, अन्यथा येत्या सोमवार दि.१३ सप्टेंबरला मुंबई मंञालय येथे प्रवेशद्वारात अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भगवानगड संघर्ष कृती समितीने दिला होता. या पार्श्वभूमीवर याबाबत पाथर्डी येथे झालेल्या  नियोजन बैठकीत ग्रामविकासमंञी तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना भगवानगड संघर्ष कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. यावेळी समितीने निवेदनात म्हटले होते की,  जायकवाडी जलाशयातून भगवानगड व परिसरातील ३५ गांवे व त्या खालील वाड्यांना नळपाणीपुरवठा योजना व्हावी, यासाठी भगवानगड संघर्ष कृती समितीच्या वतीने शासन दरबारी गेल्या आठ वर्षापासून मागणी करत आहोत. याबाबत पाथर्डी येथील दि. १४ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री यांना निवेदन देवून लक्ष वेधले होते. या मागणीबाबत सर्वच लोकप्रतिनिधींनी या योजनेबाबतची आवश्यकता आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे. याबाबत पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी आपल्या भाषणात योजनेची सत्यता जाणून घेऊन पुढील कार्यवाहीसाठी  मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता यांच्याकडे मंत्रालय (मुंबई) येथे ८ दिवसात बैठक आयोजित करणेबाबत व योजनेला गती देणेबाबत आश्वासन दिले आहे. पंरतु  
पालकमंत्री मुश्रिफ यांची बैठक होऊन पंधरा दिवस होत आले असतांना देखील याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात झालेली नव्हती, यामुळेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई मंञालय येथे प्रवेशद्वारात सोमवारी दि.१३ सप्टेंबरला भगवानगड संघर्ष कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण करणार होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!