पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गुन्हा दाखल करण्यास अडथळा !… यावर कारवाई होईल का?
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी तसेच अन्याय झालेल्यास न्याय मिळून देऊन आरोपीने केलेल्या गुन्ह्याचा तपास लावून त्याला शिक्षा होईपयर्र्ंत गुन्हाचा तपास लावून त्यास शिक्षा देण्यासाठी पोलिस ही महत्त्वपूर्ण अशी प्रशासकीय यंत्रणेत सिस्टीम आहे. पण याउलट अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस सिस्टीमचा कसा गैरवापर केला जात आहेत. याबाबत अनेकांनी थेट जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना प्रत्यक्ष भेटून कौफीयत मांडून पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याबाबत तक्रारीही केल्या आहेत. असे असतानाही पोनि श्री मुटकुळे यांच्यावर कारवाई का होत नाही… या मागील गौडबंगाल काय??… या ढिसाळ पोलिस निरीक्षकावर जिल्हा पोलिस अधीक्षक का मेहरबान आहेत, अशी विविध अनुषंगाने शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नागरिक पाथर्डी पोलिस ठाण्यातील मेहरबान पोलिस कर्मचार्यांबाबतही चर्चा करीत आहेत. शेवटी प्रश्न पडतो की, जिल्हा पोलिस अधीक्षक ओला हे पाथर्डी पोलिस ठाण्यावरच मेहरबान का? असा ही सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे. कारण की, तक्रारी करुनही न्याय मिळत नसल्याने शेवटी महादेव भागीनाथ सानप ( धांडाशेटी रा. जिरेवाडी, ता.पाथर्डी, ह.मु.वामनभाऊनगर, पाथर्डी) या गृहस्थाने पाथर्डी पोलिस ठाण्यात न्याय मिळत नसल्याने आत्मदहनाचा थेट निवेनाद्वारे इशाराच दिला आहे.

महादेव सानप या गृहस्थाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, जिरेवाडी (ता. पाथर्डी) येथे शेतजमीन आहे. माझ्या मालकीची शेत जमीनीमध्ये मला मेहनतं मशागत उत्पन्न घेण्यास शहादेव रामदास सानप, विजय शहादेव सानप व त्यांचे इतर नातेवाईक यांनी मला हरकती करून जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. मी शहादेव सानप व त्याच्या नातेवाईक यांच्याविरुध्द पाथर्डी दिवाणी न्यायालयात मनाई हुकूमाचा दावा दाखल केलेला आहे. दाव्यामध्ये पाथर्डी न्यायालयामध्ये शहादेव सानप व इतरांविरुद्ध मला माझ्या जमीनीच्या वहिवाटीस हरकती अडथळे करू नये, म्हणून मनाई हुकूम दिला आहे. असे असतानाही सन 2014 पासून शहादेव सानप व त्याचे इतर नातेवाईक हे मला माझी कोणतीही जमीनीची वहिवाट करू देत नाही व पिके घेऊन उत्पन्न घेऊ देत नाही. त्यामुळे माझ्यावर उपसामारीची वेळ आली आहे. म्हणून मी सन 2014 सालापासून वारंवार शहादेव सानप, विजय शहादेव सानप व त्यांचे इतर नातेवाईक यांच्या विरुध्द वारंवार फौजदारी स्वरूपाच्या केसेस, तक्रारी दाखल केलेल्या होत्या व आहेत. परंतु राधादेव सानप यांचा पाथर्डी पोलिस ठाण्यात येथे पोलिस कर्मचारी नितीन दराडे हा कार्यरत असल्याने मी केलेली कोणतीही तक्रारीची पोलिस कर्मचारी श्री दराडे हा पाथडी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दखल घेऊ देत नाही. त्यामुळे शहादेव सानप हा मला माइया मालकीच्या जमीनीमध्ये कोणत्याही प्रकारे येऊ देत नाही. त्यामुळे शहादेव सानप हा मला माझ्या मालकीच्या जमीनीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर गुंडप्रवृत्तीचे लोक जमा करून, मारहाण करून मला जिवे मारण्याच्या धमक्या देतो. त्यामुळे 2014 पासून माझ्या मालकीच्या जमीनी या पडीक पडल्या आहेत. मला कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन राहिलेले नाही. माझ्या व माझ्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मी दि.15 मे 2025 रोजी माझ्यावर होत असलेल्या अन्यायाची व माझ्या तक्रारीची दखल न घेतल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कुटूंबासह आत्मदहन करणार असल्याचे श्री सानप यांनी म्हटले आहे.


