पाथर्डी तालुक्यात ३ लाखांचा गुटखा जप्त ; ‘नगर एलसीबी’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पाथर्डी : येथे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला व गुटखा विक्री करणाऱ्याविरुध्द कारवाई करुन ३ लाख ३७ हजार ८१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल नगर एलसीबी टिम’ने जप्त केला आहे.

एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगावचे डिवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोकॉ किशोर शिरसाट, पोहेकॉ संतोष लोढे, पोकॉ बाळु खेडकर यांच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.११ ऑगस्ट २०२४ रोजी एसपी राकेश ओला यांच्या आदेशाने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवेध धंद्यावर कार्यवाही करणे कामी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखा पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, शिवाजी बटुळे हा त्याचे वैगनर कार (एम.एच.१२ क्यु.ड्ब्लु.२१६२) मधे महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ पानमसाला गुटखा तो त्याची चोरटी विक्री करण्याकरीता खरवंडी कासार वरुन पाथर्डीकडे येत आहे. ही माहिती
पोनि श्री आहेर यांनी तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये हद्दीमध्ये पेट्रोलिंगवर असणाऱ्या टिमला देऊन त्यांना ठिकाणी जाऊन खात्री करुन कार्यवाही करण्याबाबत तोंडी आदेश दिले.
पोलीसांनी खाजगी वाहनाने वेताळबाबा मंदीराजवळ जाऊन थाबले असता त्यांना खरवंडी रोडकडून एक वैगनर कार ही येताना दिसली. पोलीसांची खात्री होताच १०.३५ वाजण्याच्या सुमारास थांबवून त्यास पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शिवाजी मारुती बटुळे (वय ४०, रा भारजवाडी ता पाथर्डी जि. अहमदनगर) झडती घेतली असता त्याचे कब्जात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला शरीरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पानमसाला गुटखा मिळून आला. त्यांना माल कोठून आणला याबाबत विचारपुस केली असता त्याने मी माल हा मी परवेज नवाब शेख (रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर) व संजय खोले (पूर्ण नाव माहीत नाही, रा.बोधेगाव ता शेवगाव जि.अहमदनगर) यांच्याकडून आणल्याबाबत सांगितले. त्याच्याकडे मिळून आलेल्या मालाचे वर्णन खालील प्रमाणे -२६ हजार १३६ रुपये किंमतीचा केसरयुक्त विमल पानमसाला कंपनीचा एकूण १३२ पुढे प्रत्येकी १९८ रुपये किंमत, २ हजार ९०४ रुपये किंमतीची विमल पानमसाला तंबाखू असा एकूण १३२ पुडे प्रत्येकी २२ रुपयांचा, ८ हजार ७७५ रुपये किंमतीचा बाओबाजी गुटखा पान मसाला कंपनीचा एकूण ४५ पुडे प्रत्येकी १९५ रुपये किंमत असलेला., ३ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची वैगनर कार (एम.एच.१२ क्यू.ब्लु. २१६२) असा एकूण ३ लाख ३७ हजार ८१५ किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल पोहेकॉ संतोष लोढे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी जप्त केला आहे. मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला आहे.
१०.३५ वाजण्याच्या सुमारास खरवंडी ते पाथर्डी येणारे रोडवर वेताळबाबा मंदिराजवळ पाथर्डी (ता. पाथर्डी जि. अहमदनगर) येथे एक वैगनर कारामधून शिवाजी मारुती बटुळे (रा भारजवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर) हा मुद्देमाल हा महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला व शरीरास अपायकारक होईल, असा खाद्य पदार्थ गुटखा खाण्यास अपायकारक आहे, हे माहिती असताना फरारी परवेज नवाब शेख (रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, फरारी संजय खोले (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बोधेगाव, ता शेवगाव जि. अहमदनगर याच्याकडून खरेदी करुन त्याची विक्री करण्याचे उद्दशाने कब्जात बाळगून वाहतूक करतांना मिळून आला आहे. एलसीबीचे पोकॉ किशोर शिरसाट यांनी त्याच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५, ३ (५) या कलमानुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.


