पंच देण्यास टाळाटाळ केल्याने तारकपूर बसस्थानक नियंत्रकाविरुद्ध तोफखान्यात गुन्हा

पंच देण्यास टाळाटाळ केल्याने तारकपूर बसस्थानक नियंत्रकाविरुद्ध तोफखान्यात गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यादेवीनगर : शासकीय कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असताना छापा कामी पंच देण्याचे उद्देशपूर्वक टाळाटाळ केल्याने तारकपुर बसस्थानक नियंत्रकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.६ एप्रिल २०२४ रोजी अहिल्यादेवीनगर तोफखाना पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकजण मानसिक समतोलावर परीणाम करणारे पदार्थ (गांजा) हा मादक पदार्थ विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगून असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोनि आनंद कोकरे यांना मिळाली. त्यावर त्यांनी छाप्याचे नियोजन करुन छाप्यासाठी पंच मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख, तारकपूर आगार, अहमदनगर यांना लेखी पत्र पोलीस अंमलदारामार्फत तारकपूर बस आगार येथे सायंकाळी ८:३० वाजेच्या सुमारास सादर केले.
तारकपूर बसस्थानक नियंत्रक कक्षात असलेले श्री.भालेराव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांना पंच म्हणून कर्मचारी मिळणे बाबत लेखी रिपोर्ट सादर असता त्यांनी पंच म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यांना न कळविता पंच देण्यास उद्देशपूर्वक टाळाटाळ केली. महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक.डीपीपी-2012/प्र.क्र.10/पोल-10 मंत्रालय, मुंबई दि.12/05/2015 अन्वये सात वर्ष किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून देण्याबाबत आदेश असताना देखील तसेच लोकसेवक म्हणून सार्वजनिक कर्तव्य बजावण्याकामी सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करुन देणे कायद्याने बंधनकारक असताना छापा कामी पंच देण्याचे उद्देशपूर्वक टाळाटाळ करण्याचे कृत्य केले तसेच इतर कर्मचाऱ्यांना पंच होण्यापासून परावृत्त करण्यासारखे कृत्य केल्याने अहिल्यादेवीनगर तोफखाना पोलीस ठाणे प.नॉ.कॉ.रजि.नं-681/2024 भा.दं.वि.क.187 प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!