
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता – तालुक्यातील निमगाव येथे आमदार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल निमगाव को. येथे मोठी आतिशबाजी करीत, पेढे वाटून मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी निमगाव सरपंच कैलास कातोरे, उपसरपंच अजय जगताप, भारतीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, ज्येष्ठ नेते तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव पाटील बारहाते, सोसायटीचे संचालक शिवाजी आण्णा कातोरे, सखाराम नेहे, सतीश डेंगळे, राहुल कातोरे, मंगेश कातोरे, विजय गाडेकर, मनोज वदक, सिकंदर शेख, रमेश कातोरे, मनोज कुल्लाळ, सखाराम नेहे आदिंसह निमगाव ग्रामस्थ उपस्थित होते.


