संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
शिर्डी- क्रांती युवक मंडळाची विसर्जन मिरवणूक नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली आहे. यावर्षी मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारी शक्तीचा सन्मान कृतीतून व्यक्त व्हावा असे आवाहन केले त्या आवाहनाला प्रतिसाद देत आज शिर्डीतील सर्व कर्तृत्वान महिलांचा विशेष सत्कार केला.


साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानाईत यांनी मंडळाच्या विशेष उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फुर्तीने तयार केलेले ढोल पथकाने तर उपस्थित मान्यवरांचे व शिर्डी ग्रामस्थानचे मने जिंकली…
सर्व नारी शक्तीच्या शुभहस्ते श्री गणरायाची आरती केली गेली.. यावेळी द्वारकामाई वृद्धश्रमाच्या संचालिका सुधाभाभी बंडलामुडी, डॉ. मैथिली पितांबरे, कर्मचारी सोसायटीच्या चेअरमन सौ. श्रद्धा कोते, डॉ. मधुरा जोशी,डॉ. पौर्णिमा तांबे, डॉ.प्रिया जोशी,डॉ. प्राची गुजराथी, डॉ. स्मिता गोंदकर. डॉ श्रुती धनेश्वर, डॉ वृषाली गोंदकर, डॉ प्रेरणा कोठारी, डॉ वैभवी गुजराथी.
ढोल पथकाच्या गजरात उंट, घोडे दिमतीला ठेवून गणरायांना पालखीत विराजमान करून सर्व महिला भगिनी व गणेश भक्तांच्या समवेत मिरवणूक संपन्न झाली
मिरवणुकीत डोक्यावरच्या मराठ मोळ्या फेट्याने मिरवणुकीची शोभा द्विगुणित केली. तसेच वाद्य पूजन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते केले यावेळी, डॉ. गुजराती, विराट पुरोहित, तहसीलदार सुरज कुमावत, मणिलालजी पटेल,डॉ. ओंकार जोशी उपस्तित होते
मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. गिर्यारोहण, दहीहंडी, रंगपंचमी, शिवराज्यभिषेक दिन, तरुणांच्या शक्तीचे प्रतीक असलेला हनुमान जन्मोत्सव, अश्या अनेक उपक्रमाची माहिती उपस्तित नागरिकांना देण्यात आली…पालखी रोड मार्गे मिरवणुकीचे जोरदार स्वागत नागरिकांनी केले. तसेच विविध ठिकाणी पालखीत विराजमान गणरायांचे पूजन महिलांनी केले.


