नागरदेवळे ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामसभेत सकारात्मक चर्चा

नागरदेवळे ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामसभेत सकारात्मक चर्चा

घनकचरा, पिण्याच्या पाण्याची समस्या प्रामुख्याने सोडविण्याची स्थानिक नागरिकांची मागणी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यासह नगर तालुक्याचे लक्ष असलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायतीची सर्वसाधारण ग्रामसभा ही शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रशासक संजय बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली व नव्याने हजर झालेले ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबड यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि.20 ऑगस्ट 2025) ला नागदेवळे श्री संत शिरोमणी सावता माळी मंदिरात ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली.


यावेळी ग्रामसभेत प्रामुख्याने घनकचरा, सस्ते समस्या सोडविण्यासाठी, ड्रेनेज लाईन, पिण्याच्या पाणी समस्या सोडविण्याबाबत चर्चा झाली. यावेळी सभेत मुख्य पाण्याच्या लाईनला 200 बेकायदेशीर नळ कनेक्शन असल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या. तसेच विकासनिधी घेतला जातो, पण त्याप्रमाणात नागरी सुविधा मिळत नसल्याच्या बहुतांशी नागरिकांनी तक्रारी केल्या. या दरम्यान आलमगीर, गोेंधळेमळा येथील नागरिकांनी स्थनिक समस्या ड्रेनेज लाईन, रस्ते या व्हावेत, म्हणून ग्रामविकास अधिकारी श्री भाबड यांच्याकडे निवेदन दिली. या तक्रारी ग्रामविकास अधिकारी नेताजी भाबड यांनी समजावून घेतल्या. त्या सर्व समस्या टप्प्याटप्याने सोडविण्याचे आश्‍वासन देत स्थानिकांनी सहकार्य करावेत, असे आवाहन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!