संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- अल्पसंख्याक मंञी नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, काॅग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने अहमदनगर येथे माळीवाडा बसस्थानकाशेजारी शनिवारी (दि.२६) शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर जाहीर निषेध केला. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्रामभैय्या जगताप, निलेश लंके, आशुतोष काळे, किरण लहामटे, आमदार डाॅ तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, घनश्याम शेलार,संजय कोळगे, शिवशंकर राजळे, दीप चव्हाण, माणिकराव विधाते, ज्ञानदेव वाफारे, जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि.प माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र कोठारी,राजेंद्र दळवी, अविनाश घुले, संजय चोपडा, नज्जू पैलवान यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



