नगर महापालिका आयुक्तावर ‘एसीबी टिम’चा छापा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : नगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे व स्विय सहायक श्रीधर देशपांडे या दोघांनी तक्रारदाराकडे प्लाॅटवर बांधकाम परवानगीसाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने ‘जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिम’ने मनपा आयुक्त व स्विय सहायक या दोघांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार भागीदारांसह ‘4K रियाल्टी’ या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी नगर महानगरपालिका हद्दीतील नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी नगर महानगरपालिका कार्यालयात दि.18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज 254531 या क्रमांकाने केला.
बांधकाम परवानगीसाठी तक्रारदाराने मनपा आयुक्त पंकज जावळे हे स्विय सहाय्यक देशपांडे यांच्या मार्फत 9 लाख 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना आयुक्त डॉ. जावळे आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो (जालना) कार्यालयाकडे दि. 19 जून 2024 रोजी तक्रार दिली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून आयुक्त, पीए यांची लाच मागणी पडताळणी दि.19, 20 जून 2024 रोजी केली. पीए देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी 8 लाख रुपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे पीए देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाणे तोफखान्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. जालना अँटी करप्शन ब्युरो पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.


