नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चाचणीत शेतकऱ्याचा मृत्यू


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गावर चाचणी सुरू असताना रूळावर आलेल्या गायींना वाचवितांना एका शेतकर्‍याचा तसेच त्याच्या एका गायीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २४) दुपारी घडली आहे. पांडुरंग दौलत साठे (वय ७६, रा. नारायणडोह) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. नगर तालुक्यातील नारायणडोह गावच्या शिवारात हा अपघात झाला.
या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साठे हे नारायणडोह शिवारात नव्याने टाकण्यात आलेल्या अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील रेल्वे ट्रॅक नजिक आपली जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले असता हा अपघात घडला. गायी चरत चरत रेल्वे रुळावर आल्या असता चाचणी घेणारे रेल्वे इंजिन समोरून आले. त्यापासून आपल्या गायींना वाचविण्यासाठी पांडुरंग साठे पुढे झाले, मात्र ते गायीला तर वाचवू शकले नाहीत, उलट त्यांनाही आपला जीव गमवावा लागला. अपघातानंतर मयत पांडुरंग साठे यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. 

Quic

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!