नगर पोलिस प्रशासनाला ना.विखे पा, आयजी कराळेंच्या हस्ते चारचाकी, दुचाकी वाहनांचे वितरण होणार

नगर पोलिस प्रशासनाला ना.विखे पा, आयजी कराळेंच्या हस्ते चारचाकी, दुचाकी वाहनांचे वितरण होणार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पोलिस प्रशासनाला सुसज्ज करण्यासाठी नगर जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून अहमदनगर पोलिस प्रशासनाला ४६ चारचाकी व दुचाकी वाहने पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते गुरुवारी (दि.२२) पोलिस मैदानावर वितरित करण्यात येणार आहेत.
ही सर्व उपलब्ध चारचाकी, दुचाकी वाहने पोलिस प्रशासनातील आवश्यक त्या पोलिस ठाण्यांना देण्यात येणार आहेत. यामुळे काही प्रमाणात तरी, अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाला या वाहनांची मदत होणार असल्याचे अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!