नगर जिल्ह्यात ‘हर घर जल उत्सव’ विशेष मोहीम सुरू : जि.प.सीओ आशिष येरेकर

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
जल जीवन मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात हर घर जल उत्सव विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आशिष येरे कर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.


जल जीवन मिशन हा केंद शासनाचा महत्वाकांक्षी कार्यकम आहे. या कार्यक्रमांतर्गत २॰२४ पर्यंत ग्रामिण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची योजना आहे. मुबलक शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा होण्या साठी जल जीवन मिशन ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून राबविली जात आहे. राज्य शासनाने दिलेल्या सुचनानुसार जिल्हयामध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करणे, ग्रामसभा मध्ये गाव हर घर जल घोषित करणे व त्या बाबतचा ठराव करणे, गांवात सभारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जन जागृती साठी पथनाट्याचे आयोजन करणे, लोककलांकाराचा सहभाग घेऊन जन जागृती करणे, पाणी गुणवत्ता तपासणी साठी विशेष मोहीम राबविणे, हर घर जल या विशेष उत्सवा मध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा व अंगणवाडी या सर्व घटकांना सहभागी करून घेणे, संस्थात्मक नळजोडणी मध्ये ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रासह सार्वजनिक ठिकाणी नळ जोडणी देणे इत्यादी बाबत सुचना आहेत.
या उपक्रमाबाबत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे तालुका स्तरावर गटविकास अधिकारी, उपअभियंता ग्रामिण पाणी पुरवठा यांना सूचना देण्यात आल्या असून सर्वानी हर घर जल विशेष उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन सुरेश शिंदे प्रकल्प संचालक जलजीवन मिशन व आनंद रुपनर कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा जिल्हा परिषद) यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!