संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यातील पुढील वर्षी होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे अहमदनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील विश्राम विश्रामगृहावर घेतलेल्या शिवसेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अध्यक्ष पदावरून बोलत होते.
श्री.दळवी पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या योजना सर्व सामांन्या पर्यंत गेल्या की नाही ते शिवसैनिकां मार्फत प्रत्येक घरात जाऊन तपासून पाहिले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन शिवसेना घराघरात मनमनात पोहोचवणार आहोत. आगामी काळात येणाऱ्या सर्व निवडनुका शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असल्याची माहिती दळवी यांनी यावेळी दिली.पाथर्डी तालुका संघटक राजेंद्र म्हस्के म्हणाले की ना.शंकरराव गडाख यांच्या आदेशानुसार पुढील काळात होणाऱ्या निवडणुकाची तयारी करण्यासाठी बुथनिहाय कार्य कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांचे रणशिंग फुंकले असुन आजपासून त्याची नांदी सुरु झाली आहे. या बैठकीला प्रमुख अंकुश चितळे,उप तालुकाप्रमुख नवनाथ वाघ,अँड. अरुण बनकर, अनिल रांधवने,आसाराम ससे, भिवसेन अकोलकर, शरद शेंदूरकर, अंबादास कारखेले, ज्ञानेश्वर रांधवणे, शिवाजी चातूर,भिसे मामा यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नवनिर्वाचित शिवसेनेचे तालुका उपप्रमुख अरुण बनकर यांचा यावेळी जिल्हा प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संकलन: सुनिल नजन





