संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि वामनदादा कर्डक यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त … साहित्य संमेलन घेऊन खऱ्या अर्थाने उपेक्षित उपेक्षितांना आपल्या हक्काचे व्यासपीठ दिले असे वक्तव्य प्रमुख पाहुणे विद्यमान आमदार मा. संग्राम भैय्या जगताप यांनी केले तर उद्घाटक मा. श्रीकृष्ण जोशी यांनी वटवृक्षास पाणी घालून उद्घाटन केले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महापुरुष हे सर्वांचेच असतात त्यांना जातीत बंदिस्त करू नये असा मोलाचा सल्लाही दिला. ह्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून प्रख्यात गीतकार ,साहित्यिक माननीय बाबासाहेब सौदागर तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध गझलकार डॉक्टर नंदकिशोर दामोधरे हे होते.

ह्या विद्रोही संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार कवी लेखक डॉ. सुहासभाई मुळे ,मा. आनंदा कळमकर ,मा. अशोक निंबाळकर एडवोकेट संतोष गायकवाड ,’विंचवाचे तेल’ फेम मा. सुनीता भोसले कवी ,लेखक हृदयमानव अशोक ,मा.तानाजी खोडे, प्रा. नारायण खेडेकर आदी.. मान्यवर उपस्थित होते.
पहिल्या काव्यसत्राचे अध्यक्ष म्हणून खाकीतले कवी साहित्यिक मा. विनोद अहिरे सर तसेच दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष आपल्या तडाखेबंद भाषाशैलीने रसिकांचे मन जिंकून घेणारे निवृत्त पोलीस अधिकारी लेखक मा. सुभाष सोनवणे सर उपस्थित होते .
“संवाद संविधानाचा” ह्या खास सत्रातून हृदयमानव अशोक यांनी संविधानाची मूल्ये समाजात रुजणे आणि घर घर तिरंगा तसेच घर घर संविधान ही काळाची गरज आहे हे ठासून सांगितले. संस्थेतर्फे “नाठाळांच्या माथी हाणु काठी” हा काव्य पुरस्कार महाराष्ट्रातील पाच मान्यवरा कवींना प्रदान करण्यात आला.
हे संमेलन ज्यांच्या संकल्पनेतून उभे राहिले ते विद्रोही विचार मंचचे सचिव अमोल घाटविसावे यांनी , तर आयोजक म्हणून विद्रोही विचार मंचाचे उपाध्यक्ष मा. प्रकाश घोडके, खजिनदार नितेश रणदिवे ,मा.कवी अनिल गायकवाड, समन्वयक सुभाष गवळी विश्वनाथ घाटविसावे सचिन क्षेत्रे बाबासाहेब उमाप, यांनी संमेलन यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रा.संजय कांबळे,कवी सुभाष वाघमारे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
महाराष्ट्रभरातून आलेल्या कवींनी वेगवेगळ्या विषयास हात घालणाऱ्या एकापेक्षा एक सरस अशा रचना सादर करून प्रेक्षकांना उत्साहीत करत परिवर्तनवादी विचारांची पेरणी केली.
प्रास्ताविक अमोल घाटविसावे यांनी करून विद्रोही विचार मंच संस्थेचे वर्तमान कार्य तसेच भविष्यातील कार्याचा आढावा मांडला तर आपल्या अभ्यासपूर्ण तसेच सुंदर वाणीने मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचलन प्राध्यापक शर्मिला गोसावी यांनी केले आणि समारोपिय आभार प्रदर्शन संस्थेचे समन्वयक सुभाष गवळी यांनी पार पाडले.


