नगरला दरोडा तयारीत बीड जिल्ह्यातील सराईत टोळी पकडली ; ‘नगर एलसीबी’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पारनेर : तालुक्यातील भाळवणी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेली बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची टोळी ‘नगर एलसीबी’ने पकडली. या टोळीकडून ३ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचे साधने जप्त केली आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनूसार एलसीबीचे पोउपनि तुषार धाकराव व अंमलदार बापुसाहेब फोलाणे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, गणेश भिंगारदे, देवेंद्र शेलार, संदीप दरंदले, भाऊसाहेब काळे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरुण मोरे आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील वाढती गुन्हे पाहाता, एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिले होते. त्यानुसार नगर एलसीबी टिम’ अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोनि श्री. आहेर यांना माहिती मिळाली की, नगर कल्याण रोडवर भाळवणी गांवातील हॉटेल ऋषीकेशजवळ रोडच्या बाजूला काही संशयीत अंधारात थांबून कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत दबा धरुन बसलेले आहेत. त्यानुसार एलसीबी टिम’ने तात्काळ शोध मोहीम राबवून
माहिती ठिकाणी जाऊन एलसीबी टिम’ने चोहोबाजूंनी जाऊन अंधारामध्ये थांबलेल्यांना ताब्यात घेण्याचे तयारीत असतांना संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते तेथून पळून जाऊ लागले. एलसीबी टिम’ने त्यांचा पाठलाग करुन त्यातील ४ संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांचे सोबत असलेला १ संशयीत पळून गेला. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारामध्ये थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे अमोल नवनाथ काळे (वय २३), शामुल ऊर्फ शौ-या नवनाथ काळे (वय २०, दोघे रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड), सतिष ऊर्फ मुन्न लायलन भोसले (वय १९) व भरत अब्दुल भोसले (वय ४०, दोघे रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे पळून गेलेल्या संशयीताचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी पळून गेलेली मोहन निकाजी भोसले ( कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे नाव सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे गुन्हे केले, याबाबत अधिक विचारपुस करता त्यांनी सोबलेवाडी (ता. पारनेर) व चास (ता. नगर) येथे गुन्हे केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता २ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
ताब्यातील इसमांची पंचा समक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात १५ हजार रुपये किंमतीचा रियल, १५ हजार रुपये किंमतीचा विवो, ५ हजार रुपये किंमतीचा आयटेल असे ३ मोबाईल फोन, ३ लाख रुपये किंमतीच्या होंडा युनिकॉर्न कंपनीच्या २ दुचाकी, १ कोयता, १ लाकडी दांडके, १ सुती दोरी व मिरचीपुड अशी दरोड्याची साधने असा एकूण ३ लाख ३५ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.या सर्व पकडण्यात आलेल्या विरुध्दात पारनेर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४८६/२४ भादविक ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारनेर पोलीस करीत आहे.


