देर्डे – को-हाळे शिवारात दरोड्याच्या तयारीत असणारे पकडले ; एलसीबी टिम’ची कारवाई

देर्डे – को-हाळे शिवारात दरोड्याच्या तयारीत असणारे पकडले ; एलसीबी टिम’ची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोपरगाव : तालुक्यातील देर्डे – को-हाळे शिवार परिसरात दरोड्याचे तयारीत असलेला मोक्क्याचे गुन्ह्यातील फरार आरोपीसह त्याचे ४ साथीदार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत १० लाख ८३ हजार ४०० रुपये किंमतीचे साधने अहमदनगर एलसीबी टिम’ने जप्त केली आहे. मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड (वय २१, रा. इंदिरानगर, ता. कोपरगांव), अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे (वय २०, रा. एकरुखे, ता. राहाता), समाधान देविदास राठोड (वय २३, रा. करंजीबोलकी, ता. कोपरगांव), संदीप पुंजा बनकर (वय ३३, रा. द्वारकानगर रोड, शिर्डी, ता. राहाता) व उमेश तानाजी वायदंडे (वय २७, रा. गणेशनगर, ता. राहाता) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुभर्मे, शिर्डी डिवायएसपी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत थोरात यांनी एलसीबीचे अंमलदार बाळासाहेब मुळीक, रविंद्र कर्डीले, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, विश्वास बेरड, ज्ञानेश्वर शिंदे, देवेंद्र शेलार, अतुल लोटके, संतोष खैरे, विजय ठोंबरे, फुनकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, शिवाजी ढाकणे, किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, एसपी राकेश ओला यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार एलसीबीचे टिमने गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. टिमने आरोपींची माहिती काढत असताना सपोनि हेमंत थोरात यांना दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी माहिती मिळाली होती. एलसीबी टिम’ने पथकाने माहिती ठिकाणी जाऊन खात्री करता शिर्डी ते नाशिक जाणारे रोडवर, देर्डे फाट्याजवळ, साईनाथ शेर ए पंजाब हॉटेलजवळ, देर्डे – कोऱ्हाळे शिवारात रोडचे कडेला दोन चारचाकी गाड्या अंधारात लावून काहीजण अंधारामध्ये बसलेले दिसून आले. त्यावेळी पथकाची खात्री झाल्याने सदर ठिकाणी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकताच दोनजण पथकास पाहून अंधारामध्ये पळून गेले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाही. उर्वरित अंधारात बसलेले संशयीत पळण्याचे तयारीत असतांना त्यांना ताब्यात घेतले. त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारपुस करता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे मयुर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड, अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे, समाधान देविदास राठोड , संदीप पुंजा बनकर व उमेश तानाजी वायदंडे असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे पळून गेलेल्यांबाबत विचारपुस करता त्यांनी पळून गेलेल्यांची नावे फरारी गणेश भिकुनाथ तेलोरे (रा. गणेशनगर, ता. राहाता) व राहुल शिवाजी शिदोरे (रा. गोकुळनगर, कोपरगांव, ता. कोपरगांव) असे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडती व कब्जात तलवार, कटावणी, कत्ती, लाकडी दांडके, मिरचीपुड, ॲपल व ३ विविध कंपनीचे मोबाईल फोन, इर्टीगा व वोल्क्सवॅगन कार असा एकूण १० लाख ८३ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुध्द कोपरगांव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४१/२०२४ भादविक ३९९, ४०२ सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मयुर ऊर्फ भु-या अनिल गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील मोक्क्याचे गुन्ह्यात फरार आहे. त्याच्याविरुध्द खुनाचा प्रयत्न व जबरी चोरी प्रमाणे ३ गुन्हे दाखल आहे. आरोपी अमोल उर्फ ऋतुंजय अविनाश कुंदे त्याच्याविरुध्द अहमदनगर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा तयारी, दरोडा व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत.आरोपी समाधान देविदास राठोड याच्यावर अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, अपहरण करुन जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे ५ गुन्हे दाखल आहेत. आरोपी उमेश तानाजी वायदंडे याच्यावर अहमदनगर जिल्ह्यात खुन, खुनाचा प्रयत्न व दरोडा असे गंभीर स्वरुपाचे ३ गुन्हे दाखल आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!