तुळशीराम सानप यांच्या मागण्यांना यश : पाथर्डी – शेवगाव तालुक्यासाठी कोटी निधी मिळाला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील प्रजिमा व राज्यमार्ग विकासकामे पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करण्यात यावा, यासाठी  वेळोवेळी पाठपुरावा करून निवेदनाद्वारे मागणी केलेल्या कामाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुखांसह अन्य नेत्यांनी दखल घेतली आहे. यामुळेच अर्थसंकल्पात शेवगाव-पाथर्डी तालुक्यासाठी ५० कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप (रा. कुत्तरवाडी ता.पाथर्डी, जि.अहमदनगर ) यांनी दिली.


दि. १७ जून २०२२ रोजी माजी ग्रामविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. श्री सानप यांच्या निवेदनाची विशेष दखल घेऊन माजीमंत्री श्री मुश्रीफ यांनी शिफारसी तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण  यांना केल्या होत्या. याचीच विशेष दखल घेऊन तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण यांनी तत्कालीन ग्रामविकासमंञी  हसन मुश्रीफ यांच्या पत्रावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आदेश अधीक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर) यांना देण्यात आले होते.


श्री सानप यांच्या निवेदनात असे नमूद होते की, पाथर्डी शेवगाव तालुक्यातील प्रजीमा व राज्यमार्गाचे रुंदीकरण मजबुतीकरण दुरुस्तीकरण डांबरीकरण करावे या प्रकारचा उल्लेख होता. अधीक्षक अभियंता यांनी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रके  तयार करून सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठवले होते. दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी मुख्यमंत्री  एकनाथरा शिंदे तसेच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंञी  देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील रस्त्यांचे विकासकामे अर्थसंकल्पात मंजूर करावे,  अशी मागणी केली होती. त्यानुसार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी – शेवगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे  पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत.
राज्यमार्ग क्रमांक ५२ वांबोरी ते शेवगाव १)४४/६०० की.मी ते ४८/६०० कि.मी २ कोटी ३० लाख रुपये. २)५४/०० कि.मी ते ५५/३०० की.मी.१कोटी २५ लाख रुपये ३)५८/०० की.मी.ते ६१/४०० की.मी २कोटी रुपये, 👉राज्यमार्ग क्रमांक ६१ तिसगाव ते पैठण १)१४/३०० कि.मी ते १७/००की.मी २ कोटी रुपये, २)००/००की.मि ते १२/८०० कि.मी २कोटी रुपये. 👉राज्य मार्ग क्रमांक ५०* *नेवासा ते गेवराई १)२३५/८०० कि.मी.ते २३७/०० की.मी २कोटी २५लाख रुपये..२)२०६/०० की.मी ते २१०/०० की.मी  २कोटी ५० लाख रुपये. ३)२३२/०० कि.मी ते २३६/०० की.मी २कोटी रुपये, ४)२०१/०० कि.मी ते २०३/०० की.मी  १कोटी ७५ लाख रुपये. 👉पाथर्डी तालुका प्रजीमा १) प्रजिमा ३९ कोरडगाव ते बोधेगाव ००/०० की.मी ते ०५/०० कि.मी ,०९/००की.मि ते ११/००कि.मी  ३कोटी रुपये. २) प्रजीमा ४५राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ ते जेऊर. पा (पागोरी पिंपळगाव, कासार पिंपळगाव मार्गे ) ०६/०० की.मि ते १२/०० की.मी २कोटी ५०लाख रूपये. 👉प्रजीमा मार्ग क्रमांक ४७ चिंचपूर इजदे ते जोगेवाडी १)०७/०० की.मी ते ०९/०० कि.मी ३कोटी ५० लाख रुपये. २)०९/००कि.मी ते १४/६०० की.मी ३ कोटी रुपये. 👉प्रजीमा ३८ शेवगाव ते भगवानगड १२/०० की.मि ते ३०/०० कि.मी १२ कोटी रुपये. 👉शेवगाव तालुका प्रजीमा १) प्रजिमा नंबर३० मौजे आव्हाणे ते अमरापूर ५४/०० की.मी ते ५९/०० कि.मी,६३/०० की.मि ते ६४/२०० की.मी २ कोटी २५ लाख रुपये. २) प्रजीमा नंबर ४० बोधेगाव ते गदेवाडी ०८/००की.मि ते १२/०० की.मी २ कोटी रुपये. 👉 पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील प्रजीमा क्रमांक ४०,३९,३०,३८,४५,४७, तसेच राज्यमार्ग क्रमांक ६१,५२,५०या मार्गाच्या रुंदीकरणासाठी तसेच दुरुस्ती करण्यासाठी ५०कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील रस्ता निधीसाठी तसेच विशेष टाकळीमानूर जिल्हा परिषद गटातील विविध रस्त्यासाठी निधीची निवेदनाद्वारे मागण्या केल्या. त्याचा पाठपुराव्याला यश आले. यामुळे तुळशीराम सानप यांचा शेवगाव-पाथर्डी तालुक्याचा नेता म्हणूनच कौतुक केलं जात आहे.


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!