तणाव,डोकेदुखी आणि स्ट्रोकच्या समस्यांमध्ये दुप्पटीने वाढ

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या (मस्तिष्क संबंधी विकार) समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्थेतेसाठी ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण हे बदलेली जिवशैली आणि वाढता ताण तणाव आहे. लँसेटमध्ये (Lancet) प्रकाशित झालेल्या द बर्डन ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर एक्रॉस द स्टेट्स ऑफ इंडिया ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजनुसार भारतात गेल्या ३० वर्षांत मायग्रेन,तणाव आणि स्ट्रोक सारख्या आजारात दुप्पटीने वाढ झाली आहे. १९९० मध्ये या आजाराचे प्रमाणे ४ टक्के होते. त्याचे प्रमाण वाढून २०१९मध्ये ८.२ टक्के झाले आहेत. त्याचप्रमाणे कम्युनिकेबल न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची समस्या १९९० मध्ये ४.१ टक्के होती त्यात २०१९मध्ये घट होऊन १.१ टक्के झालीय. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर देशात पहिल्यांदा अशाप्रकारचा अभ्यास करण्यात आलाय. ICMR, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, इंस्टीट्यूट ऑफ मेट्रिक्स अँड इवेल्युएशन सह १०० संस्थांनी मिळून हा अभ्यास केला आहे.

२०१९ मध्ये देशात एकूण ४८.८ करोड लोक मायग्रेन आणि तणावा सारख्या मानसिक आजाराने ग्रस्त होते. यात पुरुषांपेक्षा महिलांचा सर्वाधिक समावेश होता. जवळपास २३ करोड लोक मायग्रेन आणि तणावाने ग्रस्त असताना त्यात २५ करोडहून अधिक महिला होत्या. बऱ्याच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे स्ट्रोक नंतर अल्जाइमर्स – डिमेंशियाने देखील १२ टक्के लोकांचा मृत्यू झाला होता.  पश्चिम बंगाल त्यानंतर देशातील छत्तीसगड, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये स्ट्रोक रुग्णांची संख्या अधिक होती. मिरगी (Epilepsy) आजाराचे सर्वाधिक रुग्ण हे उडीसा त्यानंतर कर्नाटक आणि उत्तराखंड राज्यात आढळून आले होते.

योग्यरित्या काम करण्यासाठी मेंदूला ऑक्सिजनची गरज असते. चांगले ब्लड सर्क्युलेशनमुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होतो. मात्र रक्तवाहिन्यांच्या नलिकांमध्ये रक्त गोठल्याने किंवा मेंदूच्या पेशींना परेसा ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. यालाच ब्रेन स्ट्रोक असे म्हणतात. ब्रेन स्ट्रोकचे दोन प्रकार आहे. एक इस्केमिक स्ट्रोल आणि दुसरा हॅमोरेजिक स्ट्रोक. पहिल्या प्रकारात मेंदूच्या पेशींमध्ये रक्त जमा होते ज्यामुळे मेंदूच्या काही भागांना ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा होत नाही. स्ट्रोकचे जवळपास ८७ टक्के रुग्ण हे पहिल्या प्रकारातील असतात. स्ट्रोकच्या दुसऱ्या प्रकारात मेंदूच्या नसा फाटतात ज्यामुळे काही भागात अनियंत्रित रक्त प्रवाह होतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!