जिल्ह्यात अ.नगर, जामखेड, शेवगाव तिरट, बिंगो जुगार , दारु विक्रेत्यावर नगर क्राईम ब्रॅंच टीमची छापेमारी

जिल्ह्यात अ.नगर, जामखेड, शेवगाव तिरट, बिंगो जुगार , दारु विक्रेत्यावर नगर क्राईम ब्रॅंच टीमची छापेमारी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Nagar Reporter Digital
अहिल्यानगर : जिल्ह्यातील अहिल्यानगर शहरासह खर्डा (ता. जामखेड), शेवगांव येथे तिरट, बिंगो जुगार व दारु विक्रेत्यावर अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने छापे टाकले. या छाप्यात ४३ आरोपींकडून ३८ लाख २० हजार ८२५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने ही कारवाई केली आहे. एसपी श्री घार्गे यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच पोनि किरणकुमार कबाडी यांनी पोउपनि समीर अभंग, पोलीस अंमलदार बिरप्पा करमल, शामसुंदर गुजर, मोहन साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे आदींची टीम तयार करुन खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, बाळासाहेब नागरगोजे, महादेव भांड, भाग्यश्री भिटे यांचे टीम तयार करुन त्या टीमने अहिल्यानगर शहरामध्ये व शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणेकामी रवाना केले होते. अवैध धंद्यावर कारवाई कामी नेमण्यात आलेल्या टीमने कारवाया केल्या. दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर शहर व शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यावर कारवाई कामी नेमण्यात आलेले टीमने एमआयडीसी. पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिषेक बाळासाहेब खाडे (वय २५, रा. लोहगांव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून बिंगो नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य साधने, रोख रक्कम असा एकुण २३ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरुध्द एमआयडीसी. पोलीस ठाणे गुरनं. ७००/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणारा देविदास झुंबर मुसळे (वय ५१, रा. ढोरजळगांव, ता. शेवगांव) याच्याविरुध्द कारवाई करुन त्याचे कब्जातून ४९ हजार ७९५ रुपये किमतीची देशी विदेशी दारु जप्त करुन शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८११/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
शेवगांव पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारु विक्री करणारी महिला उषाताई बाळासाहेब मुसळे (रा. ढोरजळगांव, ता. शेवगांव) हिच्याविरुध्द कारवाई करुन तिचे कब्जात १४ हजार १६० रुपये किंमतीची देशी विदेशी दारु मिळून आल्याने तिच्याविरुध्द शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८१०/२०२५ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी खर्डा पोलीस ठाणे हद्दीमध्ये नेमण्यात आलेले पथक अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोउपनि समीर अभंग यांना लक्ष्मण प्रभू गायकवाड व त्याचे इतर साथीदार असे जातेगांव शिवारातील जातेगांव रोड, निपाणी फाट्याजवळ पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन खात्री करता त्या ठिकाणी ५ डावांमध्ये काहीजण गोलाकार बसून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळतांना दिसले. त्या सर्वांना जागीच बसण्यास सांगून त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्याची नावे बाळासाहेब चांगदेव खाडे (वय- 50 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 2) बाळासाहेब रामचंद्र नेटके वय-63 वर्षे रा. जामखेड ता.जामखेड, 3) संतोष विजयसिंग साळुंके वय- 45 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड, 4) राजेंद्र मुरलीधर आहेर वय-39 वर्षे रा. डोकेवाडी ता.भुम, जि.धाराशिव 5) रामचंद्र बापुराव राळेभात वय-70 वर्षे रा. जामखेड ता. जामखेड, 6) दादासाहेब पांडुरंग गायकवाड वय-60 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड जि. अहिल्यानगर 7) अजय बबन सकट वय-38 वर्षे रा. खर्डा, ता.जामखेड जि. अहिल्यानगर, 8) रविंद्र महादेव भुते वय- वय-36 वर्षे रा. खर्डा ता.जामखेड 9) पवन बबन थोरात वय-37 वर्षे रा. इट ता.भुम जि.धाराशिव 10) दत्तात्रय मुरलीधर घाटे वय- 43 वर्षे रा. नागेवाडी ता. भुम जि. धारशिव 11) नितीन श्रीराम गिते वय-38 वर्षे रा. दिघोळ ता.जामखेड, 12) मारुती छना गिते वय-48 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड जि.अहिल्यानगर 13) बापु अनुरथ चव्हाण वय-40 वर्षे रा. पकरुड ता. भुम जि. धारशिव 14) सुनिल नरसिंग काळे वय-34 वर्षे रा. पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड, 15) विक्रम अरुण शिंदे वय-50 वर्षे रा.दिघोळ ता. जामखेड 16) दादासाहेब महादेव गायकवाड वय-44 वर्षे रा. जातेगांव ता.जामखेड 17) मधुकर नाथोबा बांगर वय – 60 वर्षे रा. बाहेळा ता.पाटोदा, जि.बीड 18) गणेश सुगरीब दौंड वय-39 वर्षे रा.दौंडाचीवाडी ता.जामखेड 19) पंडित किसन दाताळ वय-36 वर्षे रा. वाकी ता.जामखेड 20) चंद्रकांत नागुराव गावडे वय-50 वर्षे रा. पारगांव ता.वाशी, जि. धाराशीव 21) अहमद नुरखा पठाण वय-43 वर्षे रा.बोरखेड ता.जि.बीड, 22) पोपट उत्तम राजगुरु वय-37 वर्षे रा.दिघोळ ता.जामखेड, 23) संतोष दत्तात्रय राऊत वय-52 वर्षे रा. पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड, 24) संजय बबन भोसले वय-23 वर्षे रा.अमळनेर ता.पाटोदा जि.बीड, 25) भगवान चंद्रकांत गरड वय-34 वर्षे रा.कोष्टीगल्ली भुम ता.भुम जि.धाराशीव 26) गणेश शिवाजी शिंदे वय-48 वर्षे रा. वैद्यकीणी ता. पाटोदा जि.बीड, 27) दत्तात्रय जयसिंग खंडागळे वय-40 वर्षे रा. मात्रेवाडी ता.भुम जि.धाराशिव 28) धनजंय भगवान मोटे वय-40 वर्षे रा. गिरवली ता.भुम जि.धाराशिव, 29) बाजीराव भगवान जाधव वय-52 वर्षे रा.पाटोदा ता.पाटोदा जि.बीड, 30) अशोक उत्तम भोरे वय-35 वर्षे रा.पारगांव ता.वाशी. जि.धाराशिव, 31) शंकर दिगंबर आवारे वय-40 वर्षे रा.माळेवाडी ता. जामखेड 32) धोंडीबा बाबा येळे वय-45 वर्षे रा. मोहरी ता. जामखेड 33) फैय्याज मेहबुब सय्यद वय – 49 वर्षे रा. पाटोदा ता. पाटोदा जि. बीड, 34) लक्ष्मण प्रभु गायकवाड वय-45 वर्ष रा. जातेगांव ता. जामखेड, 35) पोपट नाना खरतोडे वय-60 वर्षे रा.बोडकेवाडी ता.पाटोदा, जि.बीड, 36) सुनिल आश्रुबा बोबडे वय – 45 वर्षे रा.इट.ता.भुम जि. धाराशिव 37) रावसाहेब उत्तम राजगुरु वय-35 वर्षे रा. दिघोळ ता. जामखेड, 38) किरण मुकुंद गोलेकर वय – 42 वर्षे रा. खर्डा ता. जामखेड, 39) अकलाक अहमद शेख वय-31 वर्षे रा. बार्शी नाका, ता. जि. बीड, 40) अशोक रावसाहेब गिते (रा. दिघोळ ता. जामखेड) असे असल्याचे सांगितले.
ताब्यातील इसमांची व ते बसलेल्या ठिकाणची झडती घेता त्यांचे कब्जामध्ये रोख रक्कम, तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणार साहित्य साधने, वाहने, मोबाईल असा एकुण ३७ लाख ३३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्याविरुध्द खर्डा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४७/२०२५ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!