जायकवाडीत पाण्याची प्रचंड वेगाने आवक ; चोवीस तासांत पाणीपातळीत तीन टक्के वाढ जलाशय काही दिवसांत भरणार !


👉पाणीपातळी ८७ टक्क्यावर पोहचली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
बोधेगाव  – 
शेवगाव-पाथर्डी-नेवासासह मराठवाड्याला वरदान ठरणारे जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे उर्ध्व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची ६४ हजार ६५३ क्युसेसने या महाप्रचंड वेगाने आवक सुरु झाली असून पाणीपातळीत गत चोवीस तासांत तीन वाढ झाली आहे. वरील भागातून आणखी पाण्याचा विसर्गात वाढ होणार असल्याने येत्या काही दिवसांत जलाशय १०० टक्के भरणार असल्याचे संकेत दिसून येत आहे. 

१५२२ फुट जलसाठवण क्षमता असलेले जायकवाडी धरण क्षमतेने भरण्यासाठी आता केवळ अडीच फुट पाण्याची आवश्यकता आहे.
वरील बहुतांश धरणे क्षमतेचे भरली असून भंडारदरा २ हजार ३४ क्युसेस, गंगापूर ३ हजार ४२६ मुळा १ हजार ८५, निळवंडे ४ हजार ७५३, नांदुर मधमेश्वर २० हजार ४२४, नागमठाण २ हजार ५२० देवगड ३ हजार ३१४ क्युसेस असा या धरणातून पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे सुरु करण्यात आला आहे. तसेच नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची नव्याने आवक होत असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आता धरणाने क्षमतेने भरण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली असून पाण्याची आवक अशीच सुरु राहिल्यास येत्या दोन दिवसांत धरण क्षमतेने भरणार असल्याचे संकेत मिळत आहे. मंगळवारी जायकवाडी जलाशयात सुमारे  ६४ हजार ६५३ क्युसेसने पाण्याची आवक होत होती. तर ८७.०३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१९.५६ फुट म्हणजेच ४६३.१६२ दलघमी झाली आहे. जलाशयात जिवंत पाणीसाठा १८८९.४५१ दलघमी, पाणीपातळी ८७.०३ टक्के तर पाण्याची आवक ६४ हजार ६५३ क्युसेसने सुरु आहे.जायकवाडी धरणाची पाणीपातळी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उप कार्यकारी अभियंता प्रेरणा बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट, शाखा अभियंता विजय  काकडे, बंडु अंधारे, गणेश खराडकर, बोधणे, अब्दुल बारी गाझी, निलेश तायडे आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. कोणत्याही क्षणी जायकवाडी जलाशय १०० टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने गोदावरीच्या पात्रातून पाणी सोडण्याचा निर्णय  कोणत्याहीक्षणी होऊ त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आज सायंकाळी दिला आहे.
संकलन : बाळासाहेब खेडकर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!