👉जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते उघडले गेट.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
शेवगाव – औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणाची पाणीपातळी ९५ टक्क्यांंवर पोहचली असून धरण तुडुंब भरले आहे. धरणात सध्या वरील भागातून सुमारे १ लाख ५ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात ९ हजार ७३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे . जायकवाडी धरणाचे आठरा दरवाजे अर्धा फुटाने उघडले आहे. धरणाचे पाणी पूजन व दरवाजे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थीतीत करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी-नेवासासह मराठवाड्याला वरदान ठरणारे
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे उर्ध्व धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची १ लाख ५ हजार क्युसेक या महाप्रचंड वेगाने आवक सुरु झाल्याने जायकवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत झपाट्याने चोवीस तासांत वाढ होऊन ९५ टक्के भरले गेले आहे
जायकवाडी जलाशयावरील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहे . दुसरीकडे जायकवाडी धरणाच्या नजीकच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. यामुळे रात्री अचानक धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांवर गेल्यास जायकवाडी प्रशासनाची मोठी धावपळ होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून आज बुधवार दि. २९ बुधवार रोजी सकाळी ११ वाजता औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण.मुख्य अभियंता विजय घोगरे. अधिक्षक अभियंता संबिरवार, एसडीएम स्वप्नील मोरे तहसीलदार चंद्रकांत शेळके, जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, मुख्यधिकारी संतोष आगळे, उपविभागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट, शाखा अभियंता विजय काकडे,यांच्यासह आदीच्या प्रमुख उपस्थितीत जायकवाडी धरणाची असलेल्या २७ दरवाजे पैकी १८ दरवाजे आज उघडण्यात आले आहेत जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात ९ हजार ७३२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे जायकवाडी विभागाच्या प्रशासनाने गोदावरी काठच्या अहमदनगर , औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, भागातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे हे धरण दुसऱ्या वर्षीही पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने लाभक्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
संकलन बाळासाहेब खेडकर



