संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –जागतिक महिला दिना निमित्त महिलांना खोमणे गुळाचा आरोग्यदायी चहा, प्रोफेसर चौक यांचे कडून मोफत चहाचे वाटप करण्यात आले या वेळी बोलतांना तोफखाना पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सौ. ज्योती गडकरी म्हणाले आज समाजात महिला असुरक्षित आहेत महिलांना सक्षम बनविणे काळाची गरज आहे. महिला दिन हे एकच दिवस साजरा करून उपयोग नाही तर महिला ही समाजातील व कुटुंबातील मुख्य घटक असून तिचा दिवस नित्य नियमाने साजरा करणे गरजेचे आहे.
या वेळी लायन्स मिडटावून क्लब चे अध्यक्षा सौ. संपूर्णा सावंत, डॉ. आदिती पानसंबळ, मा. नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा, सौ. शारदा पवार,सी. ए. सौ. सुनंदा रच्चा आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खोमणे गुळाचा चहा चे वतीने पाहुण्यांचे स्वागत सौ. वैष्णवी पासकंटी यांनी केले , तर आभार सौ. ऐश्वर्या पासकंटी यांनी मानले. शेवटी आभार संचालक अथर्व बोज्जा व शुभम पासकंटी यांनी मानले. कार्यक्रमा नंतर महिलांना पाहूण्याचे हस्ते गुळाचा चहाचे मोफत वाटप करण्यात आले.


