संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील एकलव्य शिक्षण संस्थेचे श्री वामनभाऊ विद्यालयात सोमवारी (दि.१५) ७५ वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास नरोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब बारगजे हे होते.
या कार्यक्रममप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विष्णू खाडे, काँग्रेस ता.उपाध्यक्ष पोपट बडे, डॉ अशोक बडे, अर्जुन केदार, नामदेव बडे,जगन्नाथ बडे,पत्रकार सोमराज बडे, पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती शहादेव खाडे, सोनाजी बडे, पोपट बडे, आजिनाथ बडे, सूर्यभान बडे, उद्धव केदार, शिवाजी रंधवे, आनंद रंधवे, गणेश बडे, पत्रकार सचिन बडे, संजय बडे, अशोक बडे व इतर सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यालयाने शासनाच्या परिपत्रकानुसार विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना पाहुण्याच्या हस्ते बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
झेंड्याचे चित्र रेखाटन,
चित्रकला, सामान्यज्ञान, वेशभूषासह राष्ट्रगान, नाट्य अभिनय, देशभक्तीपर वकृत्व, देशभक्तीपर गीत गायन, नृत्य इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अविष्कार रंधवे, आदित्य रंधवे या जुळ्या भावंडांसह, आरती बडे, आदिती बडे, सुजाता बडे, रेणुका बडे, भक्ती गर्जे, सानिका ढाकणे, प्रतीक्षा बडे, प्रगती राजगुरू, चैतन्य बडे, गोकुळ बडे, धनंजय राजगुरू, वाघमारे वैष्णवी या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे ग्राम.पं.चे ज्येष्ठ सदस्य विष्णू खाडे, दादासाहेब बारगजे, वैभव जोशी, पोपटराव बडे, जगगन्नाथ बडे, मुख्याध्यापक कैलास नरोडे आदींनी कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
✍संपादन-पत्रकार सोमराज बडे


