चिंचपूर पांगुळला पोळा उत्साहात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथेे शुक्रवारी (दि.२६) बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह व खाण्याजोगा होता. गेली दोन वर्ष कोरोनाचे सावट होते. त्यामुळे हा सण साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी बैलजोडीची ढोल ताशाच्या गजरात,व डीजे वाजवत साजश्रृंगार करून शेतकऱ्यांनी मिरवणूक काढत या सर्व संकटाला बाजूला सारुन पोळा सण उत्साहात साजरा केला आहे. बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा यांत्रिकिकरणावर भर असला तरी परिसरातील शेतकऱ्यांनी आपली परंपरा जोपासत बैलजोडीच्या मिरवणुका उत्साहात पार पाडत हनुमान मंदिरात विधीवत बैल पूजन केले.

असा साजरा होतो पोळा सण..!
श्रावण महिन्याच्या अंतिम टप्प्यात किंवा भाद्रपद महिन्याच्या सुरवातीस बैलपोळा हा उत्सव पार पडतो. वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या आणि शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सखासोबती असणाऱ्या बैलजोडीच्या ऋणाईत हा सण साजरा केला जातो. पोळ्याच्या पूर्वसंध्येला हळदीने खांदामळणी केली जाते. बैलांच्या खांद्यावर वर्षभर ओझे असते तो खांदा मळला जातो. शिवाय खांदामळणी आणि पोळ्याच्या दिवशी बैलजोडी ही साबणाने स्वच्छ धुतली जाते. एवढेच नाहीतर या दोन दिवसांमध्ये बैलांकडून कोणतेही काम करुन घेतले जात नाही. पोळ्याच्या दिवशी त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, पळसाच्या मुळापासून बनविलेल्या चौराचे गोंडे,नवी वेसण, नवा कासरा,पायात चांदीचे वा करदोऱ्याचे तोडे घालतात. गाईबरोबर बैलांचे लग्न लावले जाते. मिरवणुकींनतर गोड पुरणपोळीचा नैवद्य बैलांना खायला दिला जातो.
संकलन:पत्रकार सोमराज बडे
📞९३७२२९५७५७

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!