चिंचपूर पांगुळची घटना गंभीर पण, हास्यपद !… ‘रुग्णवाहिका चालक,डाॅक्टर’ ची कामगिरी कौतुकास्पद

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
दारू पिला आहे, त्याबरोबर तो औषधही पिलेल्या अवस्थेत एकजण चिंचपूर पांगुळला पडलेला आहे, असा फोन १०८ नंबर या शासकीय मदतनीस नंबर गेला, आणि त्यांनीही तत्परता दाखवत जिल्हा रुग्णालयाची रुगवाहिका घटनास्थळी आणली, वास्तविक डोंगरपट्ट्यात काही प्रमाणात होईना झालेल्या चांगल्या रस्त्यामुळे ती रुग्णवाहिका लवकर चिंचपूर पांगुळला पोहचली असो.. परंतु रुग्णवाहिकाबरोबर आलेला चालक व डाॅक्टर यांना घटनास्थळी भलताच अनुभव आला. यामुळे प्रथम ते संतप्त झाले. पण वास्तव घटना त्यांनी समजावून घेतली.


१०८ नंबर फोन करण्यामागे..माणुसकीच्या नात्याने लवकर उपचार मिळून संबंधिताच्या जीवाला धोका होऊ नये, हा उद्देश होता. या फोनला प्रतिसाद देत काही वेळेतच डोंगर दा-यात वसलेल्या चिंचपूर पांगुळला रुग्णवाहिका पोहचली. ही बाब जिल्हा रुग्णालय प्रशासन व तत्परतेने घटनास्थळी आणलेली रुग्ण वाहिका, ही कामगिरी रुग्णवाहिका चालक व डाॅक्टर यांचे कौतुकास पाञ आहे. पण ही सोमवारी (दि.२२) दिवसा ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडलेली घटना तशी गंभीर होतीच, काही प्रमाणात हास्यपद…
घटनास्थळी १०८ रुग्णवाहिका आली. यावेळी डाॅक्टर, रुग्णवाहिका चालक यांनी चिंचपूर पांगुळ येथील नवीन गावठाण परिसरात घटनास्थळी जमलेला नागरिकांना विचारणा केली, कोणी फोन केला, कुठे आहे तो माणूस… नागरिकांनी तो दारू पिलेल्या अवस्थेत पडलेल्या माणसाकडे बोट दाखवले. पण यावेळी तो दारु पिऊन औषधही पिलेला म्हणणारा रुग्णवाहिका पाहून पळून गेला. अखेर ही घटना पाहता रुग्णचालक व डाॅक्टर यांचा पार चांगलाच चढला होता, पण घटनेचे गांभीर्य पाहाता, त्यांनीही सांमजस्याची भूमिका घेतली. परंतु त्यांनी पुन्हा गंभीर घटना घडल्यास नागरिकांना १०८ ला फोन, परंतु फोन करून फसविल्यास कायदेशीर गुन्हा दाखल होईल, ही बाब त्यांनी स्थानिक नागरिकांना सुनावली. शेवटी चिंचपूर पांगुळ येथे जोगेवाडी ग्रामस्थांनी रुग्णवाहिका चालक व डाॅक्टर यांना चहा पाजून मार्गस्थ केले…

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!