👉कुटुंब प्रत्येक सदस्य १५०० रुपये वर्गणी सर्वानुमते निर्णय
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- चिंचपुर पांगुळ-मानेवाडी ग्रामस्थां तर्फे आयोजित श्री संत वामनभाऊ महाराज यांचा २०२३ साली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह’ चे नियोजनबद्ध करण्यासाठी अक्षय्यतृतीया मंगळवारी (दि.३) रामगड येथे गहिनीनाथ गडाचे महंत विठ्ठल महाराज यांच्या उपस्थितीत चिंचपुर पांगुळ-मानेवाडी ग्रामस्थांची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत गावातील कुटुंबातील प्रत्येक सदस्य १ हजार ५०० रुपये प्रमाणे वर्गणीचा निर्णय झाला असून, यावर स्वःखुशीने वर्गणी दिल्यास. कमिटीकडून भाविकांना रितसर पावती दिली जाणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोरील जुन्या गावापर्यंत जागेत अखंड हरिनाम सप्ताह चिंचपूर पांगुळला घेण्याचे सर्वानुमते बैठकीत निर्णय घेतला आहे.
या सप्ताहासाठी ७० ते ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान मंडप, कीर्तनकार, आचारी, स्वछता, आरोग्य पाणी व्यवस्था यावर चर्चा झाली.
यावेळी बैठकीत माजी सरपंच तथा भाजप अहमदनगरचे उपाध्यक्ष धनंजय पा बडे, पोपट पा.बडे, व्यापारी सचिन पा.बडे, विठ्ठल जगताप, शाहदेव खाडे, जगन्नाथ पा. बडे, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ अशोक पा. बडे, पोपटराव पा. बडे, भाऊसाहेब रंधवे, बन्सी गुरुजी, माउली मेरड, शिवाजी पा. बडे, गोविद पा. बडे सर, आजींनाथ बडे, मारोती खाडे, नितीन बारगजे, सोमनाथ धायतडक, सानप, कुटे, छबूराव राजगुरू, नवनाथ खंडागळे, आर.के पा बडे, अशोक तुकाराम पा बडे, गणेश बडे-पेंटर, सूर्यभान पा बडे, गोविंद पा बडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
✍संकलन-पत्रकार सोमराज बडे
मोबा-९३७२२९५७५७





