संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- सुगंधीत चंदनाची चोरी करून इनोव्हा गाडीतून वाहतूक करणा-या चंदनतस्कारांना कोतवाली पोलिसांनी पकडले. चंदनतस्कारांकडून ११ लाख ८४ हजार रु.च्या ३७० किलो चंदन हे काळे, पिवळे पांढरे रंगाच्या प्लाॅस्टीकच्या १७ गोण्या जप्त करण्यात आला आहे. चालक सुभाष भिमराज दिलवाले (वय ४७), राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय ३०,दोघे रा चिचोंडी पाटील ता.नगर जि.अहमदनगर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे, गुन्हे शोध पथकाचे पोना योगेश भिंगारदिवे, पोना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सलिम शेख, पोना संतोष गोमसाळे, पोना सागर पालवे, पोना राजु शेख, पोकॉ अभय कदम, पोकाॅ दिपक रोहकले, पोकॉ अमोल गाडे, पोकॉ सोमनाथ राउत, पोकाॅ अतुल काजळे, चापोहेकॉ बाबासाहेब तागड, पोकॉ प्रशांत वोरुडे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.२४ फेब्रुवारी २०२२ रोजी कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांना चंदनाचे सुगंधीत वृक्ष तोडण्यास बंदी असताना देखील दोनजण चंदनाचे वृक्ष बेकायदेशीर तोडून चोरुन आणलेले सुगंधित चंदनाचे लाकडाचे तुकडे हे त्यांचे कडील इनोव्हा गाडीमध्ये भरुन वाहतूक करून विक्री करण्यासाठी नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने ते नगर शहरातून जाणार आहेत. आत्ता जाऊन सापळा लावल्यास ते मिळून येतील, अशी माहिती मिळाली होती.
या माहितीनुसार पोनि. श्री. शिंदे सो यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला सापळा लावून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कोतवाली पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीसकडे जाणारे रोडवर सैनिकलॉन गेट समोरच्या परिसरात दि २४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे १ वा पासून सापळा लावला होता. चांदणी चौकाकडून त्यांच्या दिशेने पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास माहितीनुसार एक राखाडी रंगाधी इनोव्हा गाडी येताना दिसली. पोलिस पथकाने गाडीचे चालकास थांबण्याचा इशारा दिला असता, त्याने त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी ही रोडच्या कडेला बॅरीकेटच्या जवळ थांबवली. एमएच १२ जेयु ५६४४ असा असलेला दिसला. त्यानंतर गाडीतील इसमास खाली उतरण्यास सांगितले, असता गाडीतील दोनजण हे खाली उतरले त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे सांगितले. त्याची पंचासमक्ष त्याच्याकडील इनोव्हा गाडीची व त्यांची अंगझडती घेतली. यात ७ लाख रु किं ची एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी (क्रं MH १२ JU ५६४४), ११ लाख ८४ हजार रु किंमतीचे काळे, पिवळे, पांढरे रंगाचे प्लास्टीकच्या १७ गोणीमध्ये भरलेले सुगंधीत वृक्ष चोरुन बेकायदेशीर तोडून चंदनाचे लाकडाचे तुकडे त्याचे वजन अंदाजे ३७० किलो व त्याचा भाव अंदाजे ३२०० रुपये प्रती किलो प्रमाणे अंदाजे, १० हजार रु.किंचा एक निळे रंगाचा बीवो कंपनीचा मोबाईल फोन व एक काळे रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन, २ हजार ८९० रु रोख रक्कम सुभाष भिमराज दिलवाले याच्या अंगझडतीत मिळाली, त्यात विविध दराच्या चलनी नोटा असा एकूण १८ लाख ९६ हजार ८९० रुपयांचा मुद्देमालासह आरोपी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींविरुध्द पोना/योगेश भिंगारदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाण्यात गुरजि क्रं १४१/२०२२ सह भारतीय वन अधिनीयम १९२७ चे कलम ४९,४२,६६,६६ (अ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ भा.द.वि.कलम ३७९,३४, नियम ८२ व महाराष्ट्र अधिनीयम कलम २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोना गणेश धोत्रे हे करीत आहेत


